*हळद लागवड व प्रक्रियेचा मूलमंत्र*
Warora
महारोगी सेवा समिती संचालित वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य फलोद्यान आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय फलोद्यान मंडळ - एकात्मिक फलोद्यान विकास अभियानांतर्गत *हळद लागवड व प्रक्रिया* या विषयावर निवासी व निःशुल्क शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षणाचे उदघाटन प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, श्री राहुल तायडे, मिली पुसदेकर यांच्या उपस्थितीत झाले. या प्रशिक्षणात चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील एकूण ४३ प्रशिक्षणार्थींनी आपला सहभाग नोंदवला. हळद लागवड पूर्वतयारी, विविध जाती, लागवड पद्धती, आंतरमशागत, भरणी,एकात्मिक पीक संरक्षण, हळदमधील काढणी व काढणीनंतरचे व्यवस्थापन, हळद विक्री व्यवस्थापन व निर्यात, हळद व इतर मसाल्यांचे मूल्यवर्धन योजना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच या प्रशिक्षणात क्षेत्र भेटीचे आयोजन महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर करण्यात आले. या प्रशिक्षणात प्रा. डॉ. सुहास पोतदार, मिली पुसदेकर, डॉ. अश्विनी मानकर, डॉ. प्रशांत राखोंडे, श्री नितीन गजबे, डॉ. अनिल भोगावे, डॉ. दामोदर तिवाडे, श्री मनोज गायधने, श्री मारोती वरभे यांनी मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ. अनिल भोगावे यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी प्रा. राहुल तायडे, अनिल चौधरी, मीना अंबाडे यांनी सहकार्य केले.
*******
Comments
Post a Comment