वरोरा
चेतन लूतडे
देशपांडे पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होंडा कंपनीची निळ्या रंगाची दुचाकी (क्रमांक MH 34 CK 7880) चालवत महिला शाळेतून परतत असताना ट्रकची जोरदार धडक बसली.भयंकर धडकेनंतर महिलेला जवळपास ५० फूट ओढत ट्रक घासत नेत राहिला.
आनंदवन चौकापासून देशपांडे पेट्रोल पंपापर्यंत ही धक्कादायक घटना घडल्याने चौकातील वाहतूक काही काळ ठप्प झाली.अपघातामध्ये पोर्णिमा प्रमोद कोल्हे , राहणार देशपांडे पेट्रोल पंप लेआउट पाठीमागे राहत आहे. सदर महिला गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती होताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
*********
She is no more
ReplyDelete