माविम मार्फत महिलांसाठी जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रमस्वयंसहायता समूहातील महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

माविम मार्फत महिलांसाठी जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रम

स्वयंसहायता समूहातील महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर, २५ डिसेंबर (वृत्तसेवा) : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत खुशिया लोकसंचालित साधन केंद्र (सी.एम.आर.सी.) चंद्रपूर यांच्या वतीने जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रमांतर्गत ‘ग्रासरूट चॅम्पियन फॉर स्वयंसहायता समूह महिला महाराष्ट्र’ हा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम येथे नियोजन भवनात पार पडला.
अधिकाऱ्यांनी केले योजनांचे मार्गदर्शन:

कार्यक्रमाला माविमचे नागपूर विभागाचे विभागीय सल्लागार राजू इंगळे, विभागीय उपजिवीका सल्लागार अमित गाडे, जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी रुपेश शेंडे, जिल्हा प्रकल्प सल्लागार भुषण मुंजेकर, माहिती प्रणाली सल्लागार अमित चवरे यांनी उपस्थित राहून स्वयंसहायता समूहातील महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती पुरवली. त्यांनी योजनांचे तपशीलवार मार्गदर्शन केले तसेच काही योजनांचे अर्ज ताबडतोब भरून घेण्यात आले.

सुमारे २५० महिला लाभार्थी उपस्थित:

या कार्यक्रमाला चंद्रपूर तालुक्यातील विविध स्वयंसहायता समूहातील सुमारे अडीचशे महिला लाभार्थी हजर होत्या. खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा सुनिता गणफाडे व सचिव उज्ज्वला वरखडे यांनी सहभागी महिलांचे स्वागत केले.

'आत्मनिर्भर व्हा' असे आवाहन:

उपस्थित अधिकाऱ्यांनी महिलांना 'शासकीय योजनांचा लाभ घ्या, आत्मनिर्भर व्हा आणि प्रगतीचा मार्ग वेगाने चालून दाखवा' असे आवाहन केले. या उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबन, उद्योजकता व आर्थिक प्रगतीसाठी चालना मिळाल्याचे सांगितले गेले.

इतर उपस्थितीत होते:

कार्यक्रमाला राज्य परिवहन महामंडळाचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक किरण नागपुरे, ज्ञानेश्वर गावंडे, कल्पना राजुरकर, राणी खडसे, पुरवठा निरीक्षक भारती दोडके, व्यवस्थापक शारदा हुसे तसेच जिल्ह्यातील उपजिवीका सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments