वरोरा येथे मातीतून साकारले गणराय; विद्यार्थिनींच्या कलेची प्रदर्शनी.लोकमान्य कन्या विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

वरोरा येथे मातीतून साकारले गणराय; विद्यार्थिनींच्या कलेची प्रदर्शनी.

लोकमान्य कन्या विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

वरोरा : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येस लोकमान्य कन्या विद्यालय, वरोरा येथे 'माती पासून गणपती बनविण्याची स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. सहावी ते दहावीच्या ६० विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेऊन मातीच्या सुंदर गणपती मूर्ती तयार केल्या.
या कार्यक्रमाचे बीजारोपण करताना विद्यालयीन मुख्याध्यापिका स्मिता धोपटे यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून कलेची ओळख करून द्यावी आणि त्यातूनच कौशल्य विकसित करावे, या हेतूने ही कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. माती कशी तयार करावी, मूर्ती कशा बनवाव्यात याविषयी प्राथमिक मार्गदर्शन अविनाश कांबळे, गहुकार, मेश्राम, पतरंगे, दातारकर, धगवे या शिक्षकांनी केले.
या निमित्ताने विद्यार्थिनींनी बनवलेल्या मूर्तींची एक प्रदर्शनीही भरवण्यात आली. या उपक्रमाला नगरपालिकेचे सीईओ विशाखा शेळकी आणि लोकशिक्षण प्रसारक मंडळ, वरोरा यांचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी भेट देऊन मुलांच्या कलेचा अनुभव घेतला. यावेळी श्रीकांत पाटील यांनी सांगितले, की अशा कार्यशाळा आणि स्पर्धांमुळे मुलांमध्ये व्यावसायिक गुण निर्माण होतात आणि भविष्यात रोजगार निर्मितीचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळते. यापुढेही या ठिकाणी मोठी प्रशिक्षण केंद्रे आयोजित करण्यात येतील.

या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या संचालन करण्यात संस्थेचे संचालक मंगेश मल्हार यांचे मार्गदर्शन लाभले.
*†**************************

Comments