चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाची नोंद; परंतु कोणत्याही धक्क्यांची नागरिकांना जाणीव झाली नाही.वरोरा तालुक्यात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती.
वरोरा तालुक्यात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती.
वरोरा (चंद्रपूर): चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसर हा रविवारी भूकंपाच्या केंद्रबिंदूत असल्याची माहिती भूकंप मोजणाऱ्या अॅपद्वारे प्राप्त झाली होती. या अॅपनुसार, येथे ३.२ रिश्टर मापांकाचा भूकंप नोंडवला गेला.
मात्र, माहिती मिळाल्यानंतर वरोरा परिसरातील विशेषतः मार्दा आणि एकोना गावातील नागरिक, पोलीस पाटील आणि तलाठी यांच्याकडून संपर्क साधून खात्री केली असता कोणत्याही प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे, वेकोली खदान व्यवस्थापनाकडूनही या संदर्भात खात्री करण्यात आली असून, तिथेही भूकंपाचे कोणतेही धक्के जाणवले नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सध्या तरी या भूकंपाच्या नोंदीमुळे कोणत्याही प्रकारचे जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समजले नाही. तथापि, या घटनेनिमित्त स्थानिक प्रशासनाकडून सजगता अवलंबण्यात आली आहे.
Comments
Post a Comment