शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कारश्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शिक्षक दिन सोहळा संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार

श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शिक्षक दिन सोहळा संपन्न.

भद्रावती /चेतन लूतडे 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांच्या वतीने भव्य शिक्षक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी भद्रावती येथील श्री मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.

जाहिरात 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे

या सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये मा. श्री हंसराजजी अहीर साहेब, अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व माजी गृहराज्य मंत्री भारत सरकार, मा. श्री सुधाकरजी अडबाले साहेब, आमदार शिक्षक मतदारसंघ, मा. श्री करणजी देवतळे साहेब, आमदार ७५ वरोरा-भद्रावती विधानसभा, मा. प्रा. डॉ. अशोकजी जिवतोडे, ओबीसी नेते व अध्यक्ष चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, मा. प्रा. श्री श्रीकांतजी पाटील, अध्यक्ष लोकशिक्षण संस्था वरोरा, तसेच मा. श्री रविंद्रजी शिंदे, अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर, यांचा विशेष सहभाग होता.

ट्रस्ट व मान्यवरांचे योगदान

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनराजकाका आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील अनेक शिक्षकवृंद व मान्यवर उपस्थित राहून गुरुवर्यांविषयी आदर व्यक्त केला.

शिक्षक दिनाचे महत्त्व

उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षकांच्या समाजनिर्मितीतील योगदानाची उजळणी केली. गुरुवर्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडवलेले मोलाचे कार्य अधोरेखित करत त्यांना गुरुस्थान देण्यात आले.

शेवटी ट्रस्टच्यावतीने उपस्थित मान्यवर आणि शिक्षकवृंदांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

***********************



Comments