वरोरा
चेतन लूतडे
वरोरा : शहराच्या नगरपालिकेच्या हद्दीतील शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि नगर भवन बांधण्यासाठी विश्रामगृह येथील जवळची मोकळ्या जागेतील १५ फुट खोल असलेल्या गड्ड्यात राख भरण्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कामावर शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मते यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
या दीड एकर परिसरात अंदाजे २० ते ३० खाजगी बोरवेल तसेच नगरपालिकेचे तीन ते चार पिण्याच्या पाण्याचे बोरवेल आहेत. जवळच पिण्याच्या पाण्याची टाकीही आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मते यांच्या म्हणण्यानुसार, "ही राख भविष्यात जमिनीत मिसळून इंद्रप्रस्थ नगर आणि टिळकवार्ड व आजूबाजूच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याला दूषित करू शकते. या ठिकाणी होणारे नगर भवन व शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे होऊ शकते. त्यामुळे हे काम तात्काळ थांबवले पाहिजे." असा इशारा संबंधित विभागाला दिलेला आहे.
हे काम मेहाडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे देण्यात आले असून, कोळसा राख वर्धा पॉवर कंपनी आणि जीएमआर एमको एनर्जी यांकडून आणली जात असल्याचे दिसून आले आहे. या कंपन्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या पाहणीदरम्यान असे लक्षात आले की राख भरण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. यानंतर नगरपालिकेने काम थांबवण्याचे आदेश सहाय्यक अभियंता नयन जमदाडे व वरिष्ठ लिपिक किरन वाघमारे यांनी दिले, ज्यामुळे तात्पुरते काम बंद झाले आहे.
नगरपालिकेला इशारा देण्यात आला आहे की जर राख भरण्याचे काम पुन्हा सुरू झाले तर परिसरातील नागरिकांचा रोष त्यांना सहन करावा लागेल.
*************************
आईचा जागर कारेक्रम पावसामुळे रद्द
# 21 ऑक्टोबर ला होणार कारेक्रम #
वरोरा ता 26-- वरोरा येथील झोपला मारोती देवस्थान कमिटी तर्फे नवरात्राच्या अनुषंगाने ता 27 शनिवार ला आईचा जागर या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात होते. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार तारीख 27 ला मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून 21 ऑक्टोबर ला सदर कारेक्रम घेण्याचे आयोजक समितीने ठरविले आहे. आईचा जागर उत्सव समितीचे आयोजक मनीष जेठांनी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment