प्रस्तावित वेकोली खान आल्याचे भासवून उमरघाट येथील आदिवासी बांधवांच्या जमिनींची अवैध विक्री? मारेगाव तालुक्यात वादग्रस्त प्रकरण न्यायालयात प्रलंबित.


प्रस्तावित वेकोली खान आल्याचे भासवून उमरघाट येथील आदिवासी बांधवांच्या जमिनींची अवैध विक्री? 

मारेगाव तालुक्यात वादग्रस्त प्रकरण न्यायालयात प्रलंबित.

सेक्शन फोर लागल्याचे सांगून जमिनी विकल्या.
मारेगाव  : मौजा उमरघाट (ता. मारेगाव) येथील आदिवासी समाजाच्या कब्ज्यातील शेतजमिनींच्या अवैध विक्रीचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. संबंधित प्रकरण सध्या मारेगाव न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, तरीसुद्धा काही व्यक्तींनी लोकांची दिशाभूल करून जमिनी विक्रीचे व्यवहार सुरू केल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे.
गाव नं. २५ मधील गट नं. ८, गट नं. १६, गट नं. १७/२ व गट नं. २८ या क्षेत्रातील शेतजमिनी मागील सत्तर वर्षांपासून आदिवासी बांधवांच्या ताब्यात आहेत. या जमिनीवरच त्यांचा मुख्य उपजीविकेचा आधार आहे. तथापि, वरोरा तालुक्यातील काही जमीन दलाल व्यक्तींनी कथितरीत्या बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतजमिनी विक्रीस काढल्या असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात आदिवासी बांधवांनी न्यायालयात दाद मागितली असून प्रकरणाचा निर्णय प्रलंबित आहे. तरीदेखील संबंधित जमिनी वादग्रस्त असल्याचे माहीत असूनही लोकांची फसवणूक करून व्यवहार रेटले जात असल्याचा आरोप आहे.

आदिवासी जमिनी या दलाल विक्रेत्यांनी यांच्यासह काहीं व्यक्तींनी WCL (वेकोली) चे बोगस राजपत्र Section 4 दाखवून वणी नॉर्थ क्षेत्र, भालर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप  करण्यात आला आहे.

  • कोणताही विक्री व्यवहार करू नये — इशारा
    संबंधित शेतजमिनी वादग्रस्त व न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने कोणीही विक्री किंवा खरेदीचा सौदा करू नये, असा स्पष्ट इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे. अन्यथा अशा व्यवहारात अडकणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे वरोरा येथील अंकुश आगलावेयांचे कडून सूचित करण्यात आले आहे.
या संबंधात पत्रकार परिषद घेऊन आदिवासी बांधवांनी न्यायालयात दाद मागितली आहे. 
*********************
या संबंधातील ओरिजनल राजपत्रक खाली दिलेले आहे.



Comments