स्व.दादासाहेबांचे निष्ठावान कार्य आजही दिव्याप्रमाणे तेवत आहे - डॉ. निंबाळकर

स्व.दादासाहेबांचे निष्ठावान कार्य आजही दिव्याप्रमाणे तेवत आहे - डॉ. निंबाळकर

वरोरा, प्रतिनिधी

दादासाहेबांचे गुण गौरव ऐकण्यासाठी व त्यांच्या जीवनावरती प्रकाश टाकण्यासाठी आजही अनेक   नेते व दादावर प्रेम करणारे मागील ३९ वर्षापासून ह्या कार्यक्रमाला  येऊन त्यांच्या स्मृतीला उजाळा देत असतात हे माझ्या आयुष्यात प्रथम पाहिलेली पहिली घटना आहे, आणि अनेकदा  सभेमध्ये जातो मात्र स्मृती दिनाच्या दिवशी एक दोन भाषने झाले की लोकांची चलबचल  सुरु होते  परंतु  ह्या कार्यक्रमात शेवटच्या क्षणापर्यंत दादासाहेबांचे जीवनकार्य व त्यांचे  लोकांभिमुख कार्य  ऐकावे म्हणून त्यांचा चाहता वर्ग शेवटपर्यंत अनेकांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित असतात ह्यावरून दादासाहेबांचे कार्य हे अधोरेखित असून दादासाहेबांचे निष्ठावान कार्य आजही जनतेत दिव्याप्रमाणे तेवत आहे असे कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून डॉ. निंबाळकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. 

 ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ च्या वतीने संस्थेचे संस्थापक  अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब देवतळे यांचा ३९ वा स्मृतिदिन कार्यक्रम वरोरा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या दादासाहेब देवतळे सभागृहा मध्ये पार पडला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर  तसेच विशेष अतिथी म्हणून पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून  आमदार करण देवतळे उपस्थित  होते.

  स्व.दादासाहेब आजाद शत्रू होते त्यांचे व्यक्तिमत्व वाखाण्यासारखे होते आजही त्यांचे कार्य   अतुलनीय आहे.डॉ. विजय देवतळे व देवतळे कुटुंब त्यांचे कार्य पुढे नेत आहे. तसेच स्व.संजय देवतळे यांनी  दादासाहेब यांचे कार्य सतत पूढे  नेले,शिवाय देवतळे कुटुंब  सतत  लोकांसाठी कार्य करीत आहे.  आजही पूर्वजाचा वारसा जोपासत आहे. 
 त्यांनी पुढे असे सांगितले की,स्व. संजय देवतळे किंवा दादासाहेब असो  ते अनेकदा निवडून आले ह्याचे कारण त्यांनी जनतेची नाळ जुळून ठेवली म्हणून त्यांना  शक्य झाले.  आजही देवतळे घराण्याला  आमदार म्हणून करणच्या रूपात लोकांनी  संधी दिली. करण सुद्धा स्व. दादासाहेबांचा वारसा सुरु ठेवतील अशी मला आशा  आहे  असे माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.


मी सदैव पूर्वज्यांच्या पाठीशी राहील -आमदार करण देवतळे

  मी आमदार म्हणून  निवडून आलो असलो तरी,माझे वडील स्व. संजय देवतळे व  माझे आजोबा दादासाहेब  यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी  मला निवडून  आणण्यासाठी मोठे सहकार्य केले हे मला माहित आहे.मी सुद्धा दादासाहेब तसेच माझे वडील स्व. संजयबाबू देवतळे यांच्या काळातील कार्यकर्त्यांना कधीही विसरणार नाही व त्यांचे कार्य पुढे नेईल अशी ग्वाही आमदार करण देवतळे यांनी आपल्या भाषनातून  दिली.

 आयोजित स्व. दादासाहेब देवतळे यांच्या 39 वा स्मृती सोहळा निमित्त  उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे  सकाळी  रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.  तसेच रकतदान शिबीर, आरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे ४४५ रुग्णांनी लाभ घेतला.
 तसेच कार्यकमा पूर्वी  शेतकऱ्यांना  कृषी तज्ञांकडून कृषी मार्गदर्शन करण्यात आले. 

कार्यक्रम प्रारंभी  वरोरा येथील कर्मवीर विद्यालयाच्या मेश्राम मॅडम व विद्यार्थ्यांनी दादासाहेबा वर गौरव गीत गायले.
कार्यक्रमाचे प्रस्तविक ग्रामीण शिक्षण प्रसारक चे अध्यक्ष डॉ विजय देवतळे यांनी केले. तर संचालन मेश्राम सर व मनीषा बोरगमवार यांनी केले.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव गोपाल एकरे, उपाध्यक्ष सोनबा
भोंगळे, सदस्य उत्तमराव झाडे, रामदास डहाळकर,दिनकर ठेंगणे, राजेश देवतळे इत्यादी उपस्थित होते.


Comments