कल्पतरू गणेशोत्सव मंडळाचे सामाजिक व्रत, नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची गर्दी.

कल्पतरू गणेशोत्सव मंडळाचे सामाजिक व्रत
नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची गर्दी.

कल्पतरू गणेश मंडळाच्या आगमनाचा भव्य सोहळा संपन्न 

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा २६ ऑगस्ट २०२५: गांधी चौक येथे कल्पतरू गणेशोत्सव मंडळाद्वारे पंधरा फुट उंचीची भव्य गणपती मूर्ती स्थापन वरोरा शहरातील गांधी चौक येथे करण्यात आली आहे. अध्यक्ष चेतन विजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव यावर्षी साजरा करण्यात येत आहे. शहरातील आंबेडकर चौक येथे गणेशोत्सव आगमनाचा सोहळा भव्य दिव्य रोषणाईत करण्यात आला. त्यामुळे या गणपतीची चर्चा सर्व दूर पसरली आहे.

सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेले कल्पतरू मंडळ यांनी दरवर्षी अभिनव उपक्रम राबवित आहे.
रक्तदान शिबिराचे आयोजन, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, वैद्यकीय तपासणी शिबिर, आनंदवन मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी अल्पभार वाटप. असे बरेच उपक्रम यानिमित्ताने दरवर्षी मंडळ करीत असतात.
यावर्षी पोस्टर देखाव्याच्या मार्फत भक्तांचे आकर्षण ठरले आहे.
* 'ऑपरेशन सिंदूर' जनजागृती मोहीम
*'वोकल फॉर लोकल' आणि ऑनलाइन खरेदी थांबवा या विषयावर बॅनर-पोस्टरद्वारे जनजागृती
* लोकमान्य टिळक यांना आदरांजली
* पोलीस वर्दीतून विशेष सजावट

विशेषताः
· नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध
· गणपतीचा आशीर्वाद देणारा उजवा हात व पाय चांदीचा
· १२ फूट उंच महादेव मूर्ती
· भव्य विद्युत रोशनाई
· कल्पतरू बँड पथकाचे कार्यक्रम
· रात्रभर जागरण कार्यक्रम
सामाजिक योगदान:
· अकरा रुपये सदस्य फी योजना सुरू करण्यात आली आहे.
· दिवाळीत कल्पतरू मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.
· नगरपालिकेला घंटागाडीचे दान करण्यात आले होते.
· कोरोना काळात मोठ्या प्रमाणात मदत केली होती.
· कल्पतरू सोशल युथ फाऊंडेशनचे कार्य वरोरा शहरासाठी अग्रगण्य राहिले आहे.

क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उत्सवाला भेट देत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी सांगितले. "गणरायाच्या कृपेने समाजात समृद्धी येवो" अशी शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

कल्पतरू गणेशोत्सव मंडळाचे  शशीभाऊ चौधरी, सुनीलजी हलमारे, अदनान सिद्दीकोट,नितिन संचिति,कालू बोरा,नीरज चौधरी,सोनू मालू, निचिकेत वानखेड़े, तरुण बैद, मुन्ना एकरे,मोहम्मद सद्दीकोट,होजू अली, अमित केशवानी,अमित शाह,राजू महाजन ,ओम जाधव,पप्पू ठाकुर,रवि नरुले, राजू भाऊ चौधरी,पप्पू संचिति व सर्व सहकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करीत तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना कल्पतरू गणेश मंडळाला आवर्जून भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 
--------------------------------------------
      गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया!
*******************************


Comments