वरोऱ्यातील गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी आढावा सभाआमदार करण देवतळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली नियोजन बैठक
आमदार करण देवतळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली नियोजन बैठक
जाहिरात
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा मतदारसंघाचे आमदार करण संजय देवतळे यांच्या उपस्थितीत गणेश उत्सव आणि विसर्जनासाठी आढावा बैठक विश्रामगृह येथे घेण्यात आली. यावेळी गणेश विसर्जनादरम्यानच्या सुरक्षेच्या व्यवस्था, रस्त्याची दुरुस्ती, मिरवणुकीचे वेळापत्रक आणि सामाजिक सलोखा राखण्यावर भर देण्यात आला.
आमदार देवतळे यांनी यावेळी गावातील गणपती मंडळांची संख्या, पाणीपुरवठा योजना, रस्त्याच्या समस्या आणि तलावाच्या परिसरातील स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यांनी सर्वांना उत्साहात आणि त्रासरहित विसर्जनासाठी सहकार्याचे आवाहन केले. राजकीय पक्षांना मंडळांच्या स्वागतासाठी पेंडॉलच्या जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले.
या बैठकीत एसडीपीओ बकाल, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, भाजप जिल्हा सचिव विजय मोकाशी, बाजार समिती संचालक बाळू भोयर, भाजपा शहर अध्यक्ष संतोष पवार यांसह अनेक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
********
Comments
Post a Comment