भाजप भद्रावती महिला आघाडी तर्फे रक्षाबंधन सोहळयाचे आयोजन**बहीणींनी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा : करण देवतळे*
*बहीणींनी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा : करण देवतळे*
महीलांच्या आर्थीक सक्षमीकरणाकरीता कटीबध्द : रविंद्र शिंदे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर.
महिलांनी संघटित होऊन लहान उधोग सुरु करावे शासन अनेक योजना आहेत याचा लाभ घावा*विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर
फक्त बातमी
चेतन लूतडे
भारतीय जनता पाटी महीला आघाडी भद्रावती व्दारा मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचेकडून रक्षाबंधन निमित्त बहीणीसाठी विशेष उपहार सोहळा कार्यक्रमाचे श्री मंगल कार्यालय, भद्रावती येथे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित बहीनींना रक्षाबंधन निमित्त भेटवस्तु देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा -भद्रावती विधानसभा भाजप आमदार करण देवतळे तर उद्घाटक जिल्हा सहकारी बँक चंद्रपूर अध्यक्ष रविंद्र शिंदे तसेच सहउद्घाटक रमेश राजुकर उपस्थित होते.
मंचावरील उपस्थित मान्यवरांनी आपआपली मनोगत व्यक्त केले. प्रमुख्याने आमदार करण देवतळे यांनी भारत सरकार व महाराष्ट्र सरकारव्दारा चालविले जात असलेल्या योजना पंतप्रधान मातृवंदना योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना, अयुष्यमान भारत योजना, जलजीवन मिशन, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिला सन्मान योजन असे आणखी योजनावर प्रकाश टाकत अडीअडचण आल्यास निसंकोच संपर्क करण्याचे आवाहन उपस्थित बहीणीना केले. चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी उपस्थित बहिणींना बँकेच्या व नाबार्ड च्या विविध योजनेचा सर्वपरी मदत करण्याचे आश्वासन देत बचत गटाच्या माध्यमातून महीला आर्थीक सक्षमीकरण करण्याच पुर्ण प्रयत्न करेल असे भाषणातून प्रतिपादन केले.
रक्षाबंधन निमित्त बहीणीसाठी विशेष उपहार सोहळा कार्यक्रमात उपस्थित बहीणींनी सर्व पदाधिकारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला तसेच आमदार करण देवतळे,चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष रविंद शिंदे यांच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे कडून बहीनींना अनमोल उपहार ओवाळणी रूपात देण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तालुका प्रमुख शामसुदंर उरकुडे, देवानंद जांभुळे, शहर अध्यक्ष सुनील नामोजवार, महीला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना शेंडे, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, महीला तालुका अध्यक्षा रक्षीता निरांजणे, शहर अध्यक्ष वृषाली पांढरे सोबतच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कोषाध्यक्षा सुषमा शिंदे तसेच सिकंदर शेख, लता भोयर, प्रणिता शेंडे, प्रविण सातपूते, प्रविण ठेंगणे, लक्ष्मी सागर, अर्चना जिवतोडे, आशा ताजणे, सरला मालोकर तसेच गणमान्य भाजप तथा भाजुयुमो पदाधिकारी लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्का पदमावार, आशा ताजणे व सरला मालोकर यांनी केले तर स्वीटी नामोजवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विनोद पांढरे, प्रशांत डाखरे, इम्रान शेख, अनंत ताठे, महादेव बांगडे, गोपाल गोसवाडे, तौसीफ शेख, बबलू सैयद, गजानन बोबडे, रोशन ईखार, प्रज्वल नामोजवार, राकेश खुसपुरे व इतर कार्यकर्ते यांनी मेहनत घेत कार्यक्रम सफल केले. उपस्थित भावाना बहीनी कडून भोजनाचा रक्षाबंधन निमित्य पाहुणचार देण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
***************************
Comments
Post a Comment