सावलीत दहीहडी कार्यक्रमाचा धुमधडाका; आमदार बंटी भागडिया, सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि गायिका नुशरत जा सह हजारो सावलीकरांची उपस्थिती
आमदार बंटी भागडिया, सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि गायिका नुशरत जा सह हजारो सावलीकरांची उपस्थिती
फक्त बातमी
चेतन लूतडे
सावली, २१ फेब्रुवारी २०२५: रोहित बोम्मावार मित्रपरिवार सावली व सार्थ फाऊंडेशन सावली यांच्या संयुक्त विद्यमाने सावली येथे भव्य दहीहडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भागडिया यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रवींद्र शिंदे, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या उपस्थितीत होते. या समारंभास मराठी सिनेतारका सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध गायिका नुशरत जा यांनी विशेष आकर्षण दिले.
कार्यक्रमाचे आयोजक रोहित बोम्मावार व डॉ. सोनाली रोहित बोम्मावार यांनी सर्वांचे स्वागत केले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर यांचे संचालक जयंतभाऊ टेभूर्डे, विजयराव बावणे, आवेश खान पठाण, गणेश तळवेकर, निशिकांत बोरकर व राजीव बोरकर उपस्थित होते. सावली नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, सार्थ फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच हजारोच्या संख्येने सावलीकर या कार्यक्रमासाठी हजर होते.
उत्साहातून भरलेल्या या कार्यक्रमात सहभागी सर्वांना आनंदी आणि उत्साही वातावरणात भाग घेता आले.
Comments
Post a Comment