दोन कुत्र्यांनी एका वाघाला जंगलात पळवले. ताडोबा अभयारण्यात वाघाने गावाजवळ मांडले बस्तान वनविभाग सतर्क.
गावकऱ्यांची सावधगिरी आणि कुत्र्यांचे धाडस, वाघाचा हल्ला निष्फळ.
ताडोबा अभयारण्यात वाघाने गावाजवळ मांडले बस्तान वनविभाग सतर्क.
वरोरा
चेतन लूतडे
चंद्रपूर, (23/8/2025): चेतन लूतडे
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहरली ते मुधोली रस्ता पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले असले तरी, आता तेथे अनेक वाघाच्या उपस्थितीमुळे अशांतता निर्माण झाली आहे. शुक्रवारपासून एका वाघाने सिताराम पेठ गावाजवळ बस्तान मांडले असून गावातील शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांना धोका निर्माण झाला आहे.
शुक्रवारी दुपारी या वाघाने गाईबैलांच्या कळपावर हल्ला चढवला. याचे चित्रीकरण झाले असून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये गाईवर हल्ला केल्यानंतर दोन कुत्र्यांनी मिळून वाघावर चढाई केली यानंतर वाघ जंगलात पळून गेला. गावकऱ्यांच्या सावधतेमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे वाघाला शिकार करता आली नाही. असे असले तरी, सिताराम पेठ गावात या वाघाची दहशत पसरली आहे. याबरोबर या ठिकाणी दोन वाघ अजून आहेत. वनविभागाने या संबंधात तातडीने संरक्षण उपाय सुरू केले आहेत.
सिताराम पेठ ते मोहरली या भागात वाघांची संख्या वाढली असून, भर दिवसा पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी गाड्या थांबवण्यास मनाई केली असून, प्रत्येक ठिकाणी वनकर्मचारी नियुक्त केले आहेत. मात्र, गावातील काही युवक मोठ्या धाडसाने वाघाजवळ जाऊन आरडाओरड करताना दिसून येतात, ज्यामुळे धोक्याची शक्यता वाढली आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना व पर्यटकांना सूचना दिल्या आहेत की ते सतर्क राहावेत व वनविभागाच्या मार्गदर्शनाखेरीज धोकादायक क्षेत्रात जाऊ नयेत. ताडोबाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षेच्या खबरदारीची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
(सिताराम पेठ येथील युवक मंगेश ढोक यांनी हा व्हिडिओ चित्रीत केले आमच्या पोर्टलतर्फे धन्यवाद)
व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
बातम्या पाठवण्यासाठी 9579734429 या नंबर वर संपर्क साधा.
Comments
Post a Comment