वरोडा : श्याम ठेंगडी
वरोडा येथील शिवाजी वार्डातील एक युवक 19 ऑगस्ट पासून बेपत्ता आहे. नातलग सदर युवकाचा शोध सर्वत्र घेत असून सहा दिवस उलटल्यानंतरही तो अजूनपर्यंत सापडला नसल्याने सर्वजण चिंतेत आहेत.
वरोडा येथील शिवाजी वार्डात राहणारा रवींद्र उर्फ गोल्या गजानन देशमुख वय तीस वर्ष हा दुधाचा व्यवसाय करतो. दोन तीन दिवसापासून म्हशी घरी न आल्याने तो 19 ऑगस्ट रोज मंगळवारला म्हशीच्या शोधार्थ वनोजापर्यंत गेला असता त्याला त्याच्या म्हशी दिसून आल्या. म्हशींना आपल्या गावाकडे घेऊन येताना त्याने आपली सायकल वनोजा येथील ठेवली व तो म्हशीना घेऊन वरोड्याकडे निघाला. वनोजा येथील गणपती मंदिरापर्यंत तो म्हशी घेऊन जात असल्याचे लोकांनी पाहिले. परंतु त्यानंतर मात्र तो कोणालाही दिसला नाही. म्हशी मात्र घरी परत आल्या.
तो 19 ऑगस्ट पासून घरी न आल्याने आई-वडिलांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 ऑगस्टला वरोडा पोलीस स्टेशन येथे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण अजून पर्यंत त्याचा पत्ता लागलेला नाही. सदर युवक कोणास आढळून आल्यास त्यांनी 9673879855 किंवा 7507715298 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती नातलगांनी केली आहे.
Comments
Post a Comment