वरोरा येथे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या घरी गणपतीची भव्य स्थापना

वरोरा येथे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या घरी गणपतीची भव्य स्थापना

प्रतिनिधी
वरोरा, २७ ऑगस्ट २०२५: दरवर्षीप्रमाणे यंदाही खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वरोरा येथील निवासस्थानी गणेशोत्सवाची भव्य सुरुवात झाली. बुधवारी सकाळी विधिवत पूजा-अर्चा करून गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली.

या वर्षी पुराच्या आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना बलदंड बनवण्यासाठी बाप्पांकडे खासदार प्रतिभाताईंनी विशेष प्रार्थना केली. 'या वर्षी पूर पावसामुळे झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना बाप्पा बळ देवो' अशी साकळी त्यांनी गणपती रायाकडे मांडली.

या विशेष प्रसंगी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कुटुंबियांसह, काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि समर्थक उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने उत्साहात सहभाग घेतला आणि गणेशोत्सवाला भव्य सुरुवात केली.

गणेशोत्सवाच्या या शुभारंभाचे वातावरण आनंददायी आणि भक्तिमय होते. सर्वांनी मिळून 'गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया' अशी जयजयकार केली.

Comments