वरोरा रेल्वे पुलावरील जीवघेणी वाटचाल!** रेल्वे पुलाचे बांधकाम अजूनही अपूर्ण.

**वरोरा रेल्वे पुलावरील जीवघेणी वाटचाल!**
 
रेल्वे पुलाचे बांधकाम अजूनही अपूर्ण. 

फक्त बातमी 
चेतन लूतडे वरोरा 

वरोरा शहरातील दळणवळण्यासाठी सरदार पटेल वार्ड येथे रेल्वेने नवीन फुलाचे बांधकाम नुकतेच पूर्ण केले आहे. या ठिकाणावरून जाण्ये-येणे सुरू झाल्याने  प्रवाशांना तारेवरची सर्कस करावी लागत आहे. 

अंदाजे ४० मीटर लांबीचा रेल्वे बोगदा पार करणे वरोरा शहरातील प्रवाशांसाठी  जीवघेणे ठरत आहे. बर्याच महिन्यांच्या बांधकामानंतर बुधवारी हा बोगदा अनधिकृतपणे उघडण्यात आला, पण त्यातून जाण्याचा अनुभव भयावह आहे. खोल खड्डे, सांडपाण्याचे उघडे पाईप्स, सिमेंटचे गाळ आणि चिखलाच्या समुद्रातून प्रवाशांना वाट काढावी लागते. पुलाच्या पश्चिमेकडील झाडांच्या फांद्या इतक्या झुकल्या आहेत की त्या जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या डोक्यावर आदळण्याची भीती वाटते.  

सध्या फक्त पायी व दुचाकी वाहने ये-जा करू शकतात, चिखलात भरलेले खड्डे, घसरट जमीन आणि जिवघेणे अवघड मार्ग असल्याने महिला, वृद्ध आणि अपंग यांना तर ही वाटचाल अशक्य जवळपास आहे. विद्यार्थी दररोज जीव धोक्यात घालून हा पूल ओलांडत आहोत. "जीव मुठीत घेऊन वर्दळ करावी लागते," अशी हताशा भावना प्रवासी करीत आहे. 

हा पूल नवीन रेल्वे लाइनसाठी बांधण्यात आला, परंतु त्यामुळे शहराच्या मुख्य मार्गावर भीषण गर्दी निर्माण झाली आहे. स्थानिक लोक आता प्रशासन आणि नेत्यांच्या कृतीची वाट पाहत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेची ही गंभीर समस्या उपेक्षित राहील की तातडीने तडजोड होईल, हा मोठा प्रश्न वरोर्याच्या मनात घोळतो आहे.  

"महाभयंकर जीवघेणा रस्ता पार करताना प्रत्येक नागरिक जीवाची बाजी लावतो !"प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्ता सुरळीत करून द्यावा – सामाजिक कार्यकर्ते बंडू देऊळकर.

Comments