भद्रावती येथे चंद्रपूर मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या घरी गणपतीची भव्य स्थापना
भद्रावती, २७ ऑगस्ट २०२५: चंद्रपूर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या भद्रावती येथील निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सहपरिवाराने विधिवत पूजा-अर्चना करून गणपती मूर्तीची भद्रावती येथील राहत्या घरी स्थापना केली. यावेळी कुटुंबातील त्यांच्या पत्नी व मुलीसह गणपती आरती करून आशीर्वाद घेतले.
या निमित्ताने श्री. शिंदे यांनी यावर्षी शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन लाभून त्यांची आर्थिक परिस्थिती बलदंड व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यांनी सहकार क्षेत्रातील सर्व बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गणेशोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी शिंदे कुटुंबियांसह सहकारी क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया' या जयजयकारने वातावरण भक्तिमय झाले.
शिंदे यांनी सर्वांना संबोधित करताना म्हटले, "गणरायाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो, हीच श्रींच्या चरणी नम्र प्रार्थना आहे. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!"
Comments
Post a Comment