वरोरा दि ७ ऑगस्ट
भारताच्या सीमांचे रक्षण करतांना आपले कुटुंब ,सण - उत्सव आणि व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवणाऱ्या सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या त्यागामुळेच आपण सर्व नागरिक सुरक्षित आहोत. हा भाव लक्ष्यात घेऊन लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सदर उपक्रम राबविला.
सीमेवर उभा असलेला सैनिक हा वर्दीतला माणूस नाही तर तो आपल्या श्वासाचे रक्षण करणारा देवदूत आहे. राखीच्या प्रत्येक धाग्यांमध्ये प्रेम , कृतज्ञता आणि अभिमानाचे प्रतीक असलेली भावना गुंफलेली आहे . या राख्या सैनिकांना केवळ बहीण -भावाच्या नात्याची आठवण करून देणार नाही तर त्यांना पाठिंबा ,प्रेम आणि समाजाकडून मिळणारा सन्मानही जाणवून देतील. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागवणारा असून युवकांना आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता बाळगण्याचा संदेश देणारा आहे असे उद्गार या देशभक्तीपूर्ण उपक्रमाचे आयोजक शाळेचे मुख्याध्यापक राहुल राखे यांनी काढले. या सर्व राख्या आणि शुभेच्छा पत्र मराठा लाईट इन्फेन्ट्री, बेळगाव सैनिकांना पाठविण्यात आल्या .
एकूण १३७ विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या उपक्रमासाठी उपमुख्याध्यापक दीपक नवले, डॉ प्रशांत खुळे, सेवानिवृत्त कला शिक्षक अविनाश कांबळे ,आकाश धगवे, अभिषेक चिखलीकर, ईश्वर डाबेराव, महेश मोरे, चंद्रशेखर भोयर, अमोल सलवटकर,अंजली वरुडकर,कु. प्रियंका लांडे, बुद्धभूषण टिपले, यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment