चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय: प्रत्येक अतिथीचा ग्रामगीता भेट व भगवी टोपीने स्वागत
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय: प्रत्येक अतिथीचा ग्रामगीता भेट व भगवी टोपीने स्वागत
फक्त बातमी
चेतन लूतडे
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष श्री रवींद्र शिंदे आणि संचालक मंडळाने एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. आता पुढे बँकेच्या अध्यक्षांच्या कार्यालयात कोणीही अतिथी कार्यालयीन किंवा वैयक्तिक भेटीसाठी आला, तर त्याचा सत्कार गुरुदेव सेवा मंडळाची भगवी टोपी आणि युगग्रंथ 'ग्रामगीता' भेट देऊन करण्यात येईल.
जाहिरात
हा निर्णय बँकेच्या पहिल्याच संचालक मंडळ सभेत सर्वमताने मंजूर करण्यात आला. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे.
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्री क्षेत्र गुरुकुंज मोजरीचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणरावजी गमे यांनी बँकेच्या अध्यक्ष श्री शिंदे आणि संपूर्ण संचालक मंडळाच्या या निर्णयाचे जाहीर अभिनंदन केले आहे. श्री गमे यांनी असेही अपेक्षित व्यक्त केले की, भविष्यातही बँकेचे हे नेतृत्व गुरुकुंज आश्रमाच्या विविध समाजहितकारी उपक्रमांना सहकार्य करत राहील.
श्री रवींद्र शिंदे हे समाजसेवेच्या भावनेने परिपूर्ण आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. जन्मजात समाजसेवेची वृत्ती असलेल्या या नेत्याने आणि त्याच्या संचालक मंडळाने घेतलेला हा निर्णय चिरकाल स्मरणात राहील, अशी समाजमाध्यमांतून प्रतिक्रिया दिली जात आहे.
जाहिरात
Comments
Post a Comment