चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन; वरोरा शहरात पाहायला मिळणार तायक्वांडो स्पर्धा.
वरोरा शहरात पाहायला मिळणार तायक्वांडो स्पर्धा.
बातमी:
चेतन लूतडे वरोरा
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या सौजन्याने म.न.पा./ग्रामीण जिल्हा स्तरीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा 2025-26 या वर्षी 21 व 22 ऑगस्ट 2025 दरम्यान शेतकरी भवन, नगर परिषदेजवळ, वरोरा येथे भरविण्यात येणार आहे. स्पर्धा 14, 17 व 19 वर्ष वयोगटातील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. उद्घाटन समारंभ 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता होणार आहे. सर्व क्रीडाप्रेमींना उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. डिस्ट्रिक्ट तायक्वांडो असोसिएशन ऑफ चंद्रपूर यांच्या कमिटीचे अध्यक्ष अमन टेमुर्डे, अशोक वर्मा, सुरेश बोभाटे, ऋषी मडावी, तानाजी बायस्कर, सागर कोहळे, बजरंग वानखडे, आकाश भोयर, सचिन बोधाने, अक्षय हनमंते, महेश भिवदरे, पंकज चौधरी यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
Comments
Post a Comment