कल्पतरू गणेश मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी पत्रकारांना मान, व्हॉइस ऑफ मिडिया संघटनेच्या पत्रकाराची उपस्थिती.
कल्पतरू गणेश मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी पत्रकारांना मान
व्हॉइस ऑफ मिडिया संघटनेच्या पत्रकाराची उपस्थिती.
वरोरा -विशेष प्रतिनिधी
वरोरा येथील प्रसिद्ध कल्पतरू गणेश मंडळाला ‘व्हॉइस ऑफ मिडिया’ या पत्रकार संघटनेच्या पत्रकारांना आरतीचा मान देण्यात आल्याबद्दल पत्रकार अध्यक्षाने आभार मानले आहेत . या समारंभात व्हॉइस ऑफ मिडियाचे राज्य सदस्य दैनिक पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी, अनिल पाटील , लाईव्ह चंद्रपूरचे तथा तालुकाध्यक्ष चेतन लूतडे, दैनिक पुण्यनगरी माढेळीचे अनिल नौकरकार. सकाळ तालुका प्रतिनिधी बालकदास मोटघरे, टॉप मराठी व दैनिक लोकशाहीचे सारथी ठाकूर व दै. पब्लिक पोस्टचे शिरीष ऊगे यांच्या उपस्थितत गणेश आरतीचा कार्यक्रम पार पडला.
सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुराणा, कल्पतरू गणेश मंडळाचे अध्यक्ष चेतन विजय शर्मा ,शशीभाऊ चौधरी, परीक्षित एकरे , बोराजी यांच्यासह अनेक मान्यवर सदस्य व भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.
‘वरोराचा राजा’ म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या कल्पतरू गणेश मंडळाला दूरदूरचे भाविक भेट देतात आणि नवस बोलतात. दरवर्षी नवीन उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाचे सदस्य सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग देतात. यावर्षी मंडळाकडून वैद्यकीय शिबिरासारखे उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार संघटनेतर्फे मंडळाच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले तसेच त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
कल्पतरू गणेश मंडळातर्फे आलेल्या प्रत्येक पत्रकारांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
वरोरा शहरातील मान्यवर व्यक्तींचा समावेश असलेल्या या मंडळाकडून समाजउपयोगी कार्यासोबतच गरजूंना आर्थिक सहाय्य देण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले. शेवटी, नवसाला पावणाऱ्या या गणपतीकडे पत्रकार संघाला आरतीचा मान दिल्याबद्दल व्हॉइस ऑफ मिडियाचे राज्य सदस्य अनिल पाटील व सर्व उपस्थित सदस्यांनी मंडळाचे आभार मानले.
जाहिरात
Comments
Post a Comment