स्टुडन्ट कौन्सिल इन्चार्ज पदी पार्थ सुरेश धानोरकर यांची नियुक्ती.
फक्त बातमी
चेतन लूतडे वरोरा
स्टुडन्ट कौन्सिल इन्चार्ज पदी पार्थ सुरेश धानोरकर, डिसिप्लिन मिनिस्टर आयुष भोयर, कल्चरर मिनिस्टर संस्कार खाडे, स्पोर्ट मिनिस्टर अंश अरमुरवार यांची निवड करण्यात आली. अग्नी हाऊस कॅप्टन दर्पण सातपुते आणि जानवी बजाज, आकाश हाऊस कॅप्टन पृथ्वीराज राठोड आणि माही दरेकर, धरती हाऊस कॅप्टन अथर्व माकोडे आणि पुरविलोया, सागर हाऊस कॅप्टन श्रवण काकडे आणि माधवी पिंपळ शेंडे यांची निवड झाली. इको क्लब इन्चार्ज तेजस्विनी वर्मा तर लीडर म्हणून भावेश काकडे, शौर्य ठेंगणे, सोहम बोरावार आणि शगुन तिवारी यांना निवडले गेले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शालेय अकाडमीक कॉर्डिनेटर अनिल डोंगरे तर प्रमुख अतिथी म्हणून न्यायाधीश सुविधा पांडे (वरोरा), डायरेक्टर सोमेश मालू, प्राचार्य अनुराग मसीह आणि सहाय्यक शिक्षिका श्रद्धा चौबे उपस्थित होते. शिक्षक अक्षय नायक यांनी संचालन केले तर शिक्षिका भारती आल्हाडा आणि प्रथमेश घाटोळे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली. शपथविधीनंतर स्टुडन्ट कौन्सिल इन्चार्ज पार्थ सुरेश धानोरकर यांनी आभार प्रदर्शन केले.
Comments
Post a Comment