**"वोट कि चोरी नहीं चलेगी" – राहुल गांधी**
११ ऑगस्ट २०२५ :
फक्त बातमी
"*मोदी सरकार कायर है... **" या घोषणेखाली सोमवारी इंडिया आघाडीच्या महिला खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठोस आवाज उठवला. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा, खासदार प्रतिभा धानोरकर आणि खासदार वर्षा गायकवाड सह अनेक काँग्रेस महिला खासदारांनी नारीशक्तीने रस्त्यावर उतरून मतदारांचे हक्क रक्षण्याची हाक दिली आहे.
खासदार प्रियंका वाड्रा यांच्या नेतृत्वात संसदेच्या रस्त्यावर उतरून निर्वाचन आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले .
खासदार प्रतिभा धानोरकर , आमच्या जिल्ह्यातही दहा ते पंधरा हजार मतदान वाढलेले आहेत. याबाबत आम्ही पिटीशन दाखल करून सुद्धा आम्हाला उत्तर मिळाले नाही. बोगस मतदान झालेल्या प्रकरणात निर्वाचन आयोगाने जनतेपुढे उत्तर द्यावे.
या निषेधाच्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांनी ऐतिहासिक विधान केले:
One man one vote.
**"वोट कि चोरी नहीं चलेगी!** (मतांची चोरी आता चालणार नाही!) *महाराष्ट्राच्या विधानसभा झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. *महाराष्ट्रामध्ये 40 लाख बोगस वोटर घुसवण्यात आले होते. *मतदार यादी मध्ये बनावट वोटर ची नावे आहेत. गेल्या पाच महिन्यात एक कोटी बोगस मतदान दाखवून भाजप आणि निर्वाचन आयोग यांनी मिळून मते चोरली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये याच प्रकारे काँग्रेसचे उमेदवार पडले. याच पद्धतीने समोर येणार्या निवडणूका सुद्धा भाजपा जिंकली? असा खळबळ जनक आरोप खासदार राहुल गांधी पत्रकार परिषदेत केला आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा विश्वास जनतेला त्यांनी दिला आहे.
काँग्रेस खासदार व इतर आघाडी नेत्यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे रस्त्यावर झालेल्या प्रदर्शनाने सत्ताधाऱ्यांना स्पष्ट सूचित केले आहे: वोट की चोरी नही चलेगी l "सावित्रीच्या लेकी" आता लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहे.
Comments
Post a Comment