*भद्रावतीच्या भूमीतून समाजसेवेचे अद्वितीय उदाहरण – रविंद्र शिंदे**एक हात मदतीचा अंतर्गत ट्रस्टद्वारा आर्थीक सहकार्य*

*भद्रावतीच्या भूमीतून समाजसेवेचे अद्वितीय उदाहरण – रविंद्र शिंदे*

*एक हात मदतीचा अंतर्गत ट्रस्टद्वारा आर्थीक सहकार्य*

भद्रावती: 
स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चारिटेबल ट्रस्ट प्रत्येक क्षण समाजाच्या भल्यासाठी समर्पित करून असंख्य गोरगरिबांना आधार दिला आहे.

अलीकडील त्यांच्या कार्यातून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की, कठीण परिस्थितीत लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवता येतो.

याच अनुषंगाने आमदार करण देवतळे यांच्या हस्ते तसेच समाजसेवक रमेश राजूरकर, सुनिल नामोजवार यांच्या उपस्थीतीत रक्षाबंधन कार्यक्रमामध्ये नागपूर येथील कुमारी सुहाणी किशोर घरत हिच्या जीवनात लहान वयातच मोठे संकट आले. केवळ सहा महिन्यांची असताना मातृछत्र हरपले आणि आज तिचे वडील किशोर गजानन घरत हे गेल्या आठ महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत आहेत. आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असून, कुटुंबावर शिक्षणाचा भार पेलविणे अशक्य होते. यावेळी श्री. रविंद्र शिंदे यांच्या ट्रस्टने पुढाकार घेते स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना अंतर्गत सुहाणीचे शैक्षणिक दत्तक घेतले गेले. तिची शाळेची फी, पाठ्यपुस्तके, गणवेश, साहित्य आदी सर्व खर्च ट्रस्टच्या माध्यमातून पूर्ण होईपर्यंत केला जाईल, अशी जबाबदारी स्वीकारली गेली. तसेच सुहाणीचे वडील, श्री. किशोर घरत यांना गेल्या आठ महिन्यांपासून कॅन्सरचा उपचार सुरू आहे. अशा वेळी उपचारासाठी लागणारा खर्च पेलविणे कुटुंबासाठी शक्य नव्हते. ट्रस्टने श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान अंतर्गत आर्थिक मदत करून या कठीण काळात आधार दिला. सोबतच फक्त शिक्षण आणि आरोग्यच नव्हे तर खेळाडूंनाही संधी मिळावी, यासाठी ट्रस्टने पुढाकार घेत वरोरा येथील एस. ए. योगा इन्स्टिट्यूट तर्फे १४ विद्यार्थ्यांची संगमनेर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेली सर्व विद्यार्थी साध्या घरातून येत असल्यामुळे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक अडचणी लक्षात घेता ट्रस्टने कै. म.ना. पावडे क्रिडा स्पर्धा योजना अंतर्गत आवश्यक ते सहकार्य केले.

स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चारिटेबल ट्रस्ट संस्थापक रविंद्र शिंदे, हे सर्व काम पूर्ण पारदर्शकतेने पद्धतीने करतात. मदत थेट गरजूंना पोहोचवली जाते, कोणतेही मध्यस्थ टाळले जातात. ते समाजातील खऱ्या गरजूंना ओळखून त्यांच्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देतात.

भद्रावतीतून अशा प्रकारचे कार्य करणे हे केवळ दानशूरपणा नाही, तर एक सामाजिक बांधिलकी आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेकांनी समाजसेवेत प्रेरणा घेतली आहे. "गोरगरीब, आजारी, विद्यार्थी आणि खेळाडू" – सर्व स्तरांवरील लोकांपर्यंत मदत पोहोचवणे, हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या कार्यामुळे भद्रावतीचे नाव समाजसेवेच्या क्षेत्रात अभिमानाने घेतले जाते.

Comments