झोपला मारोती देवस्थान येथे तान्हा पोळा उत्सव संपन्न; १५ बाळ गोपाळांना मिळाली मोठी बक्षिसे. युवासेना राज्य विस्तारक, माजी शिवसेना जिल्हा संघटक मनीष जेठानी यांच्ये भव्य आयोजन

झोपला मारोती देवस्थान येथे  तान्हा पोळा उत्सव संपन्न; १५ बाळ गोपाळांना मिळाली मोठी बक्षिसे

युवासेना राज्य विस्तारक, माजी शिवसेना जिल्हा संघटक मनीष जेठानी यांच्ये भव्य आयोजन

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा, २३ ऑगस्ट २०२५: दत्त मंदिर वार्डमधील झोपला मारोती देवस्थान कमिटीतर्फे साजरा करण्यात आलेला तान्हा पोळा उत्सव उत्साहवर्धक आणि आनंददायी झाला. विवेकानंद शाळेमागे  सायंकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात ३६९ बाळ गोपाळांनी नोंदणी केली होती, ज्यानंतर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर  जेठानी परिवारासह मित्र मंडळींनी नंदीबैल आणणाऱ्या बाळ गोपाळांचे स्वागत केले. सुंदर सजावटीत आणलेले नंदीबैल व बाल गोपालांचे पोशाख पाहण्यासारखे होते. इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस दिल्याने बालगोपाल आनंदात भारावून गेले होते.

कार्यक्रमात प्रत्येक लाकडी नंदी बैल आणणाऱ्या बाळ गोपाळाला वॉटर बॉटल देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर सर्वात रंजक  बक्षिस लक्की ड्रॉ सोडतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली, ज्यामध्ये १५ विजेत्यांची निवड करण्यात आली.

बक्षिस विजेते खालीलप्रमाणे:
· प्रथम बक्षिस (सायकल): क्र. २१५ - आर्या देशमुख
· द्वितीय बक्षिस (सायकल): क्र. १९५ - यथार्थ आवरी
· तृतीय बक्षिस (सायकल): क्र. १२८ - हितोश सुपले
· चतुर्थ बक्षिस (सायकल): क्र. १४१ - शिवांश खापने
· पाचवे बक्षिस (सायकल): क्र. २१० - अर्थव मांडवकर
· सहावे बक्षिस (स्टडी टेबल): क्र. २१९ - गितांश कातोरे
· सातवे बक्षिस (स्टडी टेबल): क्र. १४४ - रुद्रांश बावीस्कर
· आठवे बक्षिस (क्रिकेट किट): क्र. ६४ - अयांश पारोदे
· नववे बक्षिस (क्रिकेट किट): क्र. ४५ - सृष्टी रुईकर
· दहावे बक्षिस (क्रिकेट किट): क्र. १५९ - विक गुप्ता
· अकरावे बक्षिस (क्रिकेट किट): क्र. १२९ - तपस्या मुन
· बारावे बक्षिस (बॅडमिंटन किट): क्र. ४४ - पियुष कैकर
· तेरावे बक्षिस (बॅडमिंटन किट): क्र.५६ - आर्यकिशोर चौभाले
· चौदावे बक्षिस (बॅडमिंटन किट): क्र. १४८ - कृतिक अनंत शाडगे
· पंधरावे बक्षिस (बॅडमिंटन किट): क्र. ३८ - वेंदात सुरेश टाले

याशिवाय, जोया मंगेश आडकिने यांना स्टडी टेबल हे विशेष बक्षिस देऊन गौरवण्यात आले.

हा सर्व कार्यक्रम सुश्री भक्ती मनीष जेठानी आणि मनीष मुरली जेठानी (युवासेना राज्य विस्तारक, माजी शिवसेना जिल्हा संघटक) यांच्या मार्गदर्शनाखाली झोपला मारोती देवस्थान परिवार तर्फे यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आणि उत्साह या उत्सवाला भेट देण्यात आला.
*************************

जाहिरात

Comments