जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

खासदार प्रतिभाताईंनी बिरसा मुंडा प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली; वरोरा येथे ऐतिहासिक रॅलीचे आयोजन.

जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

वरोरा, ९ ऑगस्ट २०२५ 
चेतन लूतडे वरोरा 

आज वरोरा येथे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आदिवासी जननायक व स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वंदन केले. यानंतर त्यांनी भव्य रॅलीत सहभागी होऊन सामाजिक एकात्मतेचा ऐतिहासिक कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहिल्या.  
रॅलीदरम्यान "एकता, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृती" या संदेशावर भर देण्यात आला. वरोऱ्यातील सर्व वयोगटातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक-युवतींनी उत्साहात सहभाग दर्शविल्यामुळे संपूर्ण परिसर उत्सवमय वातावरणाने गजबजला. सामूहिक घोषणा, राष्ट्रगीत गायन आणि बिरसा मुंड्यांच्या विचारांचे पॅनेल्स यामुळे कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.  

खासदार धानोरकर यांनी जोर देऊन सांगितले,  
"बिरसा मुंडांसारख्या वीरांनी लढलेल्या संघर्षाचा आणि त्यांनी दाखवलेले समाजसेवेचे आदर्श आपल्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. अशा कार्यक्रमांमुळे इतिहासाचा गौरव तर होतोच, शिवाय नवीन पिढीत राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटते."

या प्रसंगी  आदिवासी टायगर  सेना जिल्हाप्रमुख  शुभम टोरे व सामाजिक कार्यकर्ते मुकेश चांदेकर यांनी आदिवासी जागतिक दिनानिमित्त रॅलीचे आयोजन केले होते. शैक्षणिक संस्था तसेच आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात हजर होते.

Comments