वरोरा
चेतन लूतडे
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
वरोरा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, वरोरा येथे गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर श्री गणेशाजीची मूर्ती विधिवत पूजा व आरती करून स्थापना करण्यात आली. वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार श्री. करण संजयजी देवतळे यांच्या हस्ते प्रमुख आरती करण्यात आली.
या वेळी श्री गणरायाजीच्या स्थापनेसाठी भाजपचे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख श्री. रमेशजी राजूरकर, भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक (चंद्रपूर ग्रा.) तथा सिनेट सदस्य, गोंडवाना गडचिरोली विद्यापीठ श्री. डॉ. सागरजी वझे तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, महिला आघाडीचे सर्व प्रमुख, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे समस्त कार्यकर्ते तथा नेतेमंडळी प्रामुख्याने बहुसंख्येने उपस्थित होऊन श्री गणरायाजींचे आशीर्वाद घेतले.
******************
Comments
Post a Comment