वरोरा
चेतन लूतडे
वरोरा : *श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी** यांच्या वरोरा शाखेच्या १७ व्या वर्धापनदिनी व **"आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५"** च्या निमित्ताने गेल्या १४ ऑगस्ट रोजी शाखा परिसरात एक रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन रक्तदान केले. संस्थेने वरोरा शाखा इ.स. २००८ मध्ये सुरू केली असून अल्पावधीतच तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून वणीसह एकूण **२१ शाखा महाराष्ट्र मध्ये कार्यरत आहेत. संस्थेचे एकूण व्यवसाय **८६० कोटी रुपये एवढे आहे.
संस्था मार्फत सामाजिक हितासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या रक्तदान शिबिरात संस्थेचे उपाध्यक्ष **विवेकानंद मेडवकर**, संचालक **परिक्षित अकरे** आणि **सुरेश बडे**, शाखा व्यवस्थापक **विलास बोबडे**, तसेच कर्मचारी, अभिकर्ते आणि सभासद उपस्थित होते.
*****************
Comments
Post a Comment