चौकापासून कॉन्व्हेंट रोडवरील अतिक्रमण याच पद्धतीने काढण्याची मागणी.
चंद्रपूर, ६ ऑगस्ट
चेतन लूतडे वरोरा
नॅशनल हायवे पब्लिक वर्क डिपार्टमेंटने सब-डिव्हिजनल अभियंता एस.पी. गोगटे, वरिष्ठ अभियंता ताजने आणि कंत्राटदार कोळेश्वर यांच्या नेतृत्वाखाली वरोरा येथील आनंदवन चौक ते आनंद निकेतन कॉलेज पर्यंतच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू केली आहे. वरोरा भूमी लेख नकाशांनुसार तीस मीटर हद्दीतील सर्व व्यावसायिक अतिक्रमणे बुधवारी दुपारी पूर्णपणे हटवण्यात आली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
गेल्या वीस वर्षांपासून या भागात व्यवसायिकांनी अतिक्रमित जागेवर दुकाने उघडली होती. यामुळे आनंदवन आठवडी बाजार व दिव्यांग , महाविद्यालयीन विद्यार्थीच्या वाहतूकीवर परिणाम झाला होता. या परिसरात मासे-मटनाच्या दुकानांच्या दुर्गंधीने प्रवासी आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच दुकानांसमोर वाहने उभी केल्याने वादाची परिस्थिती निर्माण होत होती. त्यामुळे या सर्व अतिक्रमण धारकांना या संबंधात नोटीस बजावली होते. अतिक्रमण काढल्याने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आनंदवन मार्ग सुगम होणार आहे.
यावेळी येथील व्यवसायिकांनी शासनाकडे पर्यायी जागेची हॉकर्स झोन ची विनंती केली आहे. सामान्य नागरिकांनी अतिक्रमणे हटवल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तसेच कॉन्व्हेंट रोड आणि चीनोरा गावाकडील रस्त्यावरील अतिक्रमणे देखील लवकर काढावीत अशी जनतेची इच्छा आहे. वरोरा पोलिसांच्या बंदोबस्तात नॅशनल हायवे अथॉरिटीने एस.आर.के. कंपनीमार्फत ही कारवाई राबवली.
************************
Comments
Post a Comment