"मेगा बचत गट मेळावा कर्ज वितरण सोहळा – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय !"
"मेगा बचत गट मेळावा कर्ज वितरण सोहळा – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय !"
Chandrapur, chetan 29/8/25
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर ही जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रगतिशील बँक असून, विदर्भातील क्रमांक एक व महाराष्ट्रातील टॉप थ्री सहकारी बँकांमध्ये गणली जाते. पारदर्शक कामकाज, प्रामाणिक नेतृत्व आणि सहकार क्षेत्रातील नवे उपक्रम यामुळे बँकेवर सर्वसामान्य शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण जनतेचा प्रचंड विश्वास आहे.
बँकेच्या चंदनेखडा, चोरा, पे. ऑ. मुधोली शाखांच्या अंतर्गत मेगा बचत गट कर्ज वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार, ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता, कर्मवीर सभागृह, चंदनेखडा, ता. भद्रावती येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यात जिल्हाभरातील मोठ्या संख्येने बचत गटांना कर्जवाटप करण्यात येणार असून, हा उपक्रम महिलांच्या स्वावलंबनाचा आणि ग्रामीण विकासाचा नवा टप्पा ठरणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. रवींद्र श्रीनिवास शिंदे, अध्यक्ष – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भूषवणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. हंसराज अहिर, अध्यक्ष – राष्ट्रीय मागासवर्ग आयोग तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच खासदार सौ. प्रतिभाताई धानोरकर व आमदार श्री करण देवतळे हे विशेष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक श्री रमेशजी राजुरकर विशेष मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बचत गटांना कर्ज पुरवण्याचा उपक्रम सातत्याने राबवला आहे. या कर्जामुळे महिलांना लघुउद्योग सुरू करण्यास, शेतीपूरक व्यवसाय, डेअरी, पशुपालन, किरकोळ दुकाने आदी क्षेत्रात रोजगारनिर्मिती करण्यास मोठी मदत झाली आहे. बचतीची सवय, वेळेवर कर्जफेडीची शिस्त आणि सामाजिक एकोपा यामुळे बचत गट आज ग्रामीण भागातील विकासाचे खरे केंद्रबिंदू ठरले आहेत.
या सर्व यशामागे बँकेचे अध्यक्ष मा. रवींद्र श्रीनिवास शिंदे यांचे कुशल नेतृत्व आणि पारदर्शक कामकाज आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने गेल्या काही वर्षांत वेगवान प्रगती साधली असून, राज्यातील सहकार क्षेत्रात आपले ठळक स्थान निर्माण केले आहे. संचालक मंडळाचे मार्गदर्शन, कर्मचाऱ्यांचे निष्ठावान कार्य आणि ग्राहकांचा विश्वास हीच बँकेच्या यशामागची खरी ताकद आहे.
३० ऑगस्ट रोजी होणारा मेगा बचत गट कर्ज वितरण सोहळा हा केवळ कर्जवाटपाचा कार्यक्रम नसून, तो ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि सक्षम सहकाराच्या दिशेने टाकलेले मोलाचे पाऊल ठरणार आहे.
विशेष म्हणजे, २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्याने या वर्षात सहकाराच्या विविध उपक्रमांचे आयोजन बँकेमार्फत सातत्याने केले जात असून, मेगा बचत गट कर्ज वितरण सोहळा हा त्या उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग ठरत आहे.
***************************
जाहिरात
Comments
Post a Comment