सहकारी क्षेत्रातील महत्त्वाची घटना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरोरा शाखेत शेअर्स प्रमाणपत्रांचे वाटप समारंभ
: सहकारी क्षेत्रातील महत्त्वाची घटना
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरोरा शाखेत शेअर्स प्रमाणपत्रांचे वाटप समारंभ
चंद्रपूर जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष मा. रविंद्र शिंदे आणि संचालक श्री. जयंत टेमुर्डे यांच्या हस्ते वरोरा येथील बँक शाखेत विविध सहकारी संस्थांना शेअर्स प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी वरोरा, निमसडा, दहेगाव, जामगाव, खांजी, सुर्ला, बोर्डा, तुळाना, वनोजा, शेंबळ, कळमगव्हान, करंजी, एकार्जुना, मारडा, चरूर येथील सेवा सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बँकेचे अधिकारी राजेंद्र मिश्रा, जनार्धन डुकसे तसेच सहकारी क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते यावेळी हजर होते.
*********************
भाजप महिला आघाडीच्या रक्षाबंधन कार्यक्रमात मान्यवरांचा सन्मान
चिमुर विधानसभा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीद्वारे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे चंद्रपूर जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रखर राष्ट्रवादी भाजप नेत्या सुश्री नुपूरताई शर्मा यांनी भूषवले. या समारंभास माजी आमदार मितेशजी भांगडीया, लोकप्रिय आमदार बंटी भांगडीया, सीडीसीसी बँक उपाध्यक्ष संजयजी डोंगरे तसेच पक्षाचे सर्व विंगचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक व बहिणी उपस्थित होत्या.
*******************
: चिमुर येथेचालू असलेल्या श्रीमद् भागवत सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवर संत श्री राजारामजी महाराज आणि भागवत कथाकार संत श्री. कृपारामजी महाराज यांचे भांगडिया परिवारातील ज्येष्ठ माजी आमदार श्री. मितेशजी भांगडिया आणि श्री. श्रीकांतजी भांगडिया यांनी स्वागत केले. संत श्री. कृपारामजी महाराज यांनी शुकदेवजी द्वारा कथा प्रारंभ, विदुर एवं कर्दम देवहूती प्रसंग, कपिल अवतार, सांख्यशास्त्राचे ज्ञान, ध्रुव प्रसंग यावर प्रवचन केले. या आध्यात्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित भक्तांनी लाभ घेतला.
*******************************
जाहिरात
Comments
Post a Comment