श्री नितीन मत्ते यांच्या पुढाकारात भद्रावती येथील युवकांना सरावासाठी चांगले मैदान मिळावे यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

श्री नितीन मत्ते यांच्या पुढाकारात भद्रावती येथील युवकांना सरावासाठी चांगले मैदान मिळावे यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

फक्त बातमी
चेतन लूतडे 

भद्रावती : पोलीस भरती व सैन्य भरतीसाठी सराव करणाऱ्या भद्रावती शहरातील युवक-युवतींना योग्य ते मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री नितीन मत्ते यांनी उपविभागीय अधिकारी (एसडीओ), वरोरा यांना सादर केले. यावेळी श्री आशिष ठेंगणे व श्री मनीष बुच्चे हे त्यांच्या सोबत होते.

ऑर्डनन्स फॅक्टरी (ओएफ), चांदा येथील ग्राउंडवर हे युवक पूर्वी सराव करत. मात्र, फॅक्टरी प्रशासनाने त्यांना तेथे सराव करण्यास मनाई केल्यामुळे त्यांना भद्रावती येथील पोलीस स्टेशनच्या मागील क्रिडा संकूल मैदानावर सराव करावा लागत आहे. हे मैदान अतिशय खराब स्थितीत असल्याने युवकांना सराव करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

श्री मत्ते यांना या समस्येची कल्पना येताच ते तात्काळ उपविभागीय अधिकारी यांच्याशी भेटण्यास गेले. त्यांनी एसडीओ यांना एक निवेदन सादर करून दोन गोष्टींची विनंती केली: ओएफ, चांदा येथे युवकांना पुन्हा सराव करण्याची परवानगी मिळवून द्यावी आणि भद्रावती येथील क्रिडा मैदानाची तात्काळ दुरुस्ती करून ते सरावासाठी योग्य बनवावे, जेणेकरून या महत्वाकांक्षी युवक-युवतींचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल.

या निवेदनासमयी सराव करणारे श्री गौरव घोरूडे, चेतन घोरपडे, बंडू उपरे, विठ्ठल चिंचोरकर, विठ्ठल बुच्चे, कैलास बोरकुटे, पूनम आस्कर, अक्षय आस्कर, प्रतिक वरखडे, प्रथम गेडाम, उज्वल बुच्चे, राकेश बदखल, अर्पित कुमरे, बावणे, अभय दुर्गे, अक्षय दुर्गे, गौतम असमपल्लीवार, प्रकाश आस्कर, तनिष्क ढेंगळे, कुणाल उपरे, राहूल आस्कर, प्रविण झाडे, राकेश सावणकर, सुधिर सावणकर, ओम मडावी, रितेश आसमपल्लीवार, त्र्येंबकेश चुटे, आकाश क्षिरसागर, जयेन्द्र चेंदे, सुमित बारतीने, सुरज क्षिरसागर, डेव्हीड साव, मनिष साव, अमोल इखारे, शादाब शेख, साहील बारतीने, मनिष राजूरकर, शुभम सिलार व इतर अनेक युवक-युवती हजर होते.

Comments