वरोडा शहरास बसत आहेत हादरे* *नागरिकात भीतीचे वातावरण*

*वरोडा शहरास बसत आहेत हादरे*

 *नागरिकात भीतीचे वातावरण*

 वरोडा : श्याम ठेंगडी 
      वरोडा शहरातील काही भागात  दुपारच्या सुमारास हादरे बसत असून या हादऱ्यांमुळे  परिसरातील नागरिकात चिंतेचे व भितीचे वातावरण पसरले आहे. आज ७ ऑगस्ट रोज गुरुवारला बसलेला हादरा तर तीव्र स्वरूपाचा होता. मात्र सतत दुपारी साडेतीनच्या सुमारास जाणवणारे हे हादरे कशामुळे बसत आहेत हा एक शोधाचा विषय आहे. 
          हे हादरे शिवाजी वार्डातील स्नेहांकित नगर,ओम नगर, आंबेकर लेआउट या भागात तर तीव्रतेने बसत आहेत. हे हादरे मात्र ठराविक वेळेत बसतात. या हादऱ्यांमुळे घरांची दारे,खिडक्या हालतात. जाणवणाऱ्या या हादऱ्यांमुळे नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
या हादऱ्यामुळे या परिसरातील नागरिकात भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.
        ‌‌ ‌ वरोड्यापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वेकोलीच्या एकोणा खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे हे हादरे बसत असावे असे काहींचे म्हणणे आहे.मात्र बसणाऱ्या या  हादऱ्यांमुळे नागरिकांची वित्तहानी किंवा जीवहानी झाल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. एकोणा खाणीतील ब्लास्टिंग मुळे हे हादरे बसत असल्यास नागरिकांच्या होणाऱ्या संभाव्य नुकसानीची वेकोली प्रशासन जबाबदारी स्वीकारेल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
        या परिसरातील नागरिकांना सतत बसणारे हे हादरे कशामुळे जाणवत आहेत याची चौकशी करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करत आहे.

Comments