भद्रावती येथे स्व. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीगंध कार्यक्रम आणि 'सरसेनापती' पुस्तकाचे भव्य विमोचन

भद्रावती येथे स्व. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीगंध कार्यक्रम आणि 'सरसेनापती' पुस्तकाचे भव्य विमोचन

भद्रावती, ५ ऑगस्ट २०२५:
चेतन लूतडे वरोरा 

आदरणीय स्व. श्री मोरेश्वरराव टेमुर्डे साहेब यांच्या जयंतीनिमित्त श्री मंगल कार्यालय, भद्रावती येथे आयोजित "स्मृतीगंध" कार्यक्रमात गण्यमान्य व्यक्ती, नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी **रक्तदान शिबीर** आणि **आरोग्य शिबीर** यांसारख्या सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. 
 

 पुस्तक विमोचन व गौरव:  
कार्यक्रमाचा केंद्रबिंदू म्हणजे स्व. टेमुर्डे साहेब यांच्या अभंग जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या "सरसेनापती" या पुस्तकाचे औपचारिक विमोचन. महाराष्ट्र कृषी मूल्य आयोग, मुंबईचे अध्यक्ष **मा. पाशा पटेल** यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र कृषी मूल्य आयोग मुंबई अध्यक्ष मा. पाशाजी पटेल , प्रमुख पाहुणे म्हणून मागासवर्गीय आयोग, भारत सरकारचे अध्यक्ष हसंराज अहिर , अध्यक्ष सी.डी.सी.सी. रवींद्र शिंदे, डॉ. रमेश राजूरकर, डॉ. अशोक जिवतोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. 

या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी  स्व. टेमुर्डे यांच्या पत्नी श्रीमती मायाबाई मोरेश्वरराव टेमुर्डे तसेच जयंत टेमुर्डे परिवारासह उपस्थित होते. विधानसभा क्षेत्रातील साहेबांवर प्रेम करणारे असंख्य नागरिक मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा यांचे अध्यक्ष  पुरुषोत्तम स्वान उपस्थित होते.

या प्रसंगी, मा. पाशा पटेल यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या आयोजकांनी चंद्रपूर मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा सन्मानपूर्वक गौरव केला. यावर शिंदे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, आयोजक आणि नागरिकांचे हृदयपूर्वक आभार मानले. त्यांनी टेमुर्डे साहेब यांच्या विचारांचा समाजहितासाठी पुढील पिढ्यांपर्यंत विचार पोहोचवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरल्याचे भावपूर्ण वक्तव्य केले.
*********

Comments