वरोरा, 6 ऑगस्ट
चेतन लूतडे
आज संसद भवनाच्या पायऱ्यांवर सर्व काँग्रेस खासदारांनी एकत्र येऊन खासगी क्षेत्रातील पेन्शनधारकांच्या न्याय्य आणि सन्मानजनक पेन्शनच्या मागणीसाठी सरकारविरोधी जोरदार आंदोलन केले.
खासगी क्षेत्रात आयुष्यभर प्रामाणिक सेवा बजावलेल्या असंख्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर योग्य पेन्शन मिळावी, ही त्यांची मूलभूत आणि वाजवी अपेक्षा असताना, केंद्र सरकारकडून त्यांच्या या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदारांनी हातात फलके व घोषणापत्रे घेऊन संसद भवनासमोर उत्स्फूर्त निदर्शने केलीत.
लोकतंत्र मे बहस जरुरी हैl, चर्चा नको चूप्पी नही चलेगीl, वोटर नही सरकार बदलेगीl या पद्धतीचे घोषणापत्र लिहून सदनाच्या बाहेर काँग्रेस खासदारांनी तीव्र निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधले होते.
यामध्ये खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार वर्षाताई गायकवाड यासह अनेक काँग्रेस खासदार उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने नेहमीच श्रमिक, शेतकरी, कामगार, निवृत्त कर्मचारी व सामान्य जनतेच्या हिताचा पाठपुरावा केला आहे आणि भविष्यातही अशाच प्रकारे सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढत राहील, असे आंदोलनादरम्यान काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आले.
Comments
Post a Comment