वरोरा दि ७ ऑगस्ट
फक्त बातमी
केंद्र व राज्य शासनाच्या सात वर्षावरील बालकांच्या शिक्षणाच्या सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यांतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांना दिलेल्या निवेदनातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी केली.
चंद्रपूर जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रात औद्योगिक जिल्हा म्हणून परिचित आहे .या जिल्ह्यामध्ये चार पावर प्लांट,असंख्य कोळसाखदानी व सिमेंट उद्योग, लोह खनिजावर प्रक्रिया करणारे कारखाने ,फलोराइड माईन, इत्यादी कारखाने कार्यरत आहेत. सदर कारखान्यांमध्ये रोजंदारी मजूर मजुरी करणारे भरपूर परप्रांतीय मजूर आहेत त्यांचे पाल्य नियमित शाळेत जात नाहीत .त्याचप्रमाणे कैचीला धार लावणारे, कचरा वेचणाऱ्यांची मुले ,त्याचप्रमाणे विविध सिग्नल वर भिक्षा मागणारी मुले या सगळ्यांची नावे शाळेमध्ये दाखल आहेत. मात्र त्यांची उपस्थिती शाळेमध्ये अत्यल्प आहे किंवा नगण्य आहे.
तेव्हा अशा मुलांना शाळाबाह्य विद्यार्थी संबोधता येईल. करिता अशा मुलांना किमान साक्षर करता यावे व केंद्र आणि राज्य शासनाच्या शिक्षणाच्या सक्तीच्या कायद्याअंतर्गत अशा शाळाबाह्य मुलांचे शोधन करून त्यांना परत शाळेमध्ये टाकण्याचा कायदा असताना देखील चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण विभाग हेतू पुरस्कर याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
या संपूर्ण परिस्थितीची जाणीव शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी गुरुवारी शालेय मंत्री दादाजी भुसे यांना करून दिली व जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम तीव्र करण्यासंदर्भात निवेदन दिले. याप्रसंगी तालुकाप्रमुख श्रीकांत खगार, भद्रावती तालुका संघटक सुरज शहा, सुमित हस्तक, भद्रावती उपशहर प्रमुख मनीष बुचे, अविनाश उके इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment