वरोरा, ३ ऑगस्ट २०२५
प्रतिनिधी
सकाळी अंदाजे ११:३० वाजता एकार्जुना चौक येथे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते व 'एम एच ३४' व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन राजू जाजूर्ले (राजू भाऊ) यांच्यावर ८ ते १० अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. घटनेत जाजूर्ले यांना घेराव घालून जोरदार मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांना ओळखत नसल्याचे त्यांनी पोलिसांना नमूद केले आहे.
ऐकरजुना चौकात त्यांचे मित्र सपन डे यांच्यासोबत बसून असताना अचानकपणे अनोळख्या युवकांनी घेराव घालून "माझ्या भावाला काय म्हटले" म्हनत हल्ला झाला. व हल्लेखोरांनी ठिकाणावरून पलायन केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संदिग्ध युवक कैद असल्याची माहिती प्राप्त झाली असून वरोरा पोलिस त्या दिशेने तपास करीत आहे.
जाजूर्ले सध्या खाजगी वैद्यकीय उपचार घेत असून, त्यांची स्थिती स्थिर आहे.
वरोरा पोलीस स्टेशनमध्ये जाजूर्ले यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिस घटनेच्या मागचा हेतू आणि हल्लेखोरांची ओळख शोधत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, *"या मारहाणीमागे राजकीय किंवा सामाजिक कारना व्यतिरिक्त अजूनही कारण असू शकते"* अशी शंका व्यक्त केली जात आहे, कारण जाजूर्ले सोशल मीडियावर निर्भीडपणे विचार मांडतात. तथापि, अद्याप घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
***********
Comments
Post a Comment