चंद्रपूर, २५ ऑगस्ट २०२५: आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन आणि चंद्रपूर जिल्हा योगासन क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा (वरिष्ठ गट) या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा २२, २३ आणि २४ ऑगस्ट या कालावधीत आनंदवन येथे पार पडली.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन आमदार श्री. करन देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. भारतीताई आमटे, श्रीकांत पाटील, डॉ. अरुण खोडस्कर, डॉ. मृणाल काळे, सुधाकर कहु, प्रा. सवाने, डॉ. विजय पोळ, राजेश पवार, माधव कवीवर, कवीश्वर सर, तानाजी बायस्कर आणि देशमुख सर या गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.
स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या योगपटूंनी आपले कौशल्य प्रदर्शित केले. योगपटूंनी केलेल्या उत्तम सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.
योगासन ही केवळ क्रीडा नसून तो आरोग्य, मनःशांती आणि एकाग्रतेचा अमूल्य वारसा आहे, असे स्पर्धेच्या निमित्ताने सांगण्यात आले. अशा स्पर्धांमुळे तरुणांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास वाढेल, अशी खात्री यावेळी व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment