मराठा आरक्षण चळवळीवरून चंद्रपुरात ओबीसी समाजाचा निषेध
चंद्रपूर
अंकुश अवथे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत मुंबईकडे कूच सुरू केली आहे. मात्र त्यांच्या या पावलाचा चंद्रपुरात तीव्र निषेध नोंदवला जात आहे.
आज चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकात ओबीसी समाजाकडून निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली मनोज जरांगे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.अशोक जीवतोडे म्हणाले की, मनोज जरांगे हे काही विशिष्ट नेत्यांच्या सांगण्यावरून आंदोलन करत असून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यासाठीच मुंबईकडे निघाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांच्या नोंदी ‘कुणबी’ आहेत, त्यांनाच प्रमाणपत्र द्यावे, मात्र सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन काही राजकीय नेते, मनोज जरांगे यांना पुढे करून राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही आरोप जीवतोडे यांनी केला.
Comments
Post a Comment