सीसीटीव्ही मध्ये चोरटे कैद.
वरोरा
वरोरा तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर हायवेवर सिटी पॉइंट हॉटेलजवळील हसन अमूल शॉपी मध्ये पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये यामुळे मोठी दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतील रोकड आणि काही मौल्यवान सामानावर हात साफ केला. दुकानांमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे. सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता व्यापाऱ्यांना ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी देखील या परिसरात चोरीच्या काही घटना घडल्या असल्याने व्यापाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
**********************
जाहिरात
Comments
Post a Comment