चंद्रपूर जिल्हा तायक्वांडो स्पर्धा उत्साहात पार पडली

चंद्रपूर जिल्हा तायक्वांडो स्पर्धा उत्साहात पार पडली

वरोरा 
चेतन लूतडे 

चंद्रपूर (२२ ऑगस्ट): क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या वतीने शेतकरी भवन, वरोरा येथे २१ व २२ ऑगस्ट या कालावधीत मनपा शहर व ग्रामीण स्तरावरील तायक्वांडो स्पर्धा भव्य पद्धतीने पार पडली. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अविनाश पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली डिस्ट्रिक्ट तायक्वांडो असोसिएशन ऑफ चंद्रपूर व एअर बोर्न ट्रेनिंग सेंटर यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.

स्पर्धेच्या नियमांची काटेकोर पालनाची देखरेख विशेष क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, जिल्हा क्रीडा समन्वयक वाल्मीक खोब्रागडे यांनी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जयंत टेमुर्डे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अशोक वर्मा, श्री. सुनील बांगळे, श्री. गणेश मुसळे, श्री. नरेंद्र बोरीकर व श्री. गुरुदेव जुंबडे यांनी सहभाग घेतला. इंटरनॅशनल रेफरी तेजंकित भोंगडे व नॅशनल रेफरी राजत गायकवाड या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निर्णायकांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष प्रतिष्ठा लाभली.

अध्यक्ष श्री. अमन टेमुर्डे, श्री. अशोक वर्मा, उपाध्यक्ष श्री. तानाजी बायस्कर, श्री. सागर कोहळे व सचिव श्री. बजरंग वानखडे (एनआयएस कोच, आंतरराष्ट्रीय पदक विजेते) यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा शिस्तबद्ध पार पडली. सहसचिव श्री. आकाश भोयर (राष्ट्रीय पदक विजेते) व खजिनदार श्री. सचिन बोधाने (राष्ट्रीय पदक विजेते) यांनी संघांना मार्गदर्शन केले. सल्लागार श्री. अक्षय हणमंते (राष्ट्रीय पदक विजेते) व श्री. मुकेश पांडे (एनआयएस कोच) यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. पंकज चौधरी, पंकज शेंडे, दिव्या नंदनवार व जयंत विधाते यांनी सहाय्यक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. संघटन कौशल्य व खेळाडूंच्या उत्साहामुळे ही स्पर्धा पारदर्शक, यशस्वी व संस्मरणीय ठरली.

Comments

Post a Comment