अखिल भारतीय ग्राहक पंचायत वरोरा तालुका कार्यकारीणी गठीत* *अध्यक्ष हितेश राजनहिरे तर सचिव किशोर देठे*

*अखिल भारतीय ग्राहक पंचायत  वरोरा तालुका कार्यकारीणी गठीत* 

 *अध्यक्ष हितेश राजनहिरे तर सचिव किशोर देठे* 

वरोरा ( प्रतिनिधी) :  वरोरा येथील द्वारका नगरी येथे हनुमान मंदिरात परिसरात वसंतराव व-हाटे संघटन मंत्री अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली व पुरुषोत्तम मत्ते मार्गदर्शक अ. भा. ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपूर यांच्या उपस्थितीत नुकतीच अ. भा. ग्राहक पंचायत तालुका वरोरा ची सभा घेण्यात आली. या सभेत नवीन कार्यकारीणी घोषित करण्यात आली.
यामध्ये अ. भा. ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष हितेश राजनहिरे, सचिव किशोर देठे, संघटन मंत्री दिलीप मोडक, उपाध्यक्ष प्रशांत ताजणे, सहसचिव वैशाली बेलेकर,सहसंघटन मंत्री उमेश देशमुख, कोषाध्यक्ष विजय लांबट, प्रसिद्धी प्रमुख शिरीष उगे, महीला प्रमुख दिपकांता ठवरे, कार्यकारीणी सदस्य वामन नौकरकर, नथ्थुजी दडमल, पुरुषोत्तम रासकर नामदेव वांढरे, विठ्ठल मोहुर्ले, श्रीकृष्ण धाडसे, पुरुषोत्तम आंबटकर, लिलाधर बोरेकर, मंजषा ढुमने, शुभांगी आपटे, पांडुरंग कोमरेड्डीवार, राजेश तामगाडगे, प्रविण मुधोळकर, चंद्रहासक जिवतोडे, रासेदा शेख यांची निवड करण्यात आली व नवनियुक्तांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. 
नवीन कार्यकारिणी भविष्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे कार्य समोर नेत ग्राहकांचे प्रश्न मार्गी लावून समाजपयोगी कार्य करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
यावेळी सर्व सभासद सभेला उपस्थित होते व सदर कार्यकारीणी आज पासून कार्यान्वित करण्यात आली.




Comments