भाजपमध्ये अनिल धानोरकर आणि १० नगरसेवकांचा प्रवेश,
वरोरा-भद्रावती विधानसभेमध्ये राजकीय भूकंप
जाहिरात
चंद्रपूर : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील राजकीय भूकंप झाला. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि प्रभावी नेते अनिल धानोरकर यांच्या नेतृत्वात १५ जणांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये जाहीर प्रवेश केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय वरिष्ठ नेते हंसराज अहिर तसेच विधानसभेचे आमदार करण देवतळे यांच्या उपस्थितीत भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी भाजपचे सभासदत्व स्वीकारले. धानोरकर यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रशांत झाडे, प्रमोद नागरिक, विनोद वानखेडे, निलेश देवाईकर, संदीप कुमरे, माजी नगरसेविका रेखा राजुरकर, लिला दुमने, प्रतिभा निमकर, शारदा ठवसे, शुभांगी उमरे तसेच माजी बांधकाम सभापती प्रवीण महाजन आणि रोटरी अध्यक्ष मंगेश मते यांनी सामूहिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला.
अनिल धानोरकर हे माजी खासदार बाळू भाऊ धानोरकर यांचे मोठे बंधू आहेत, या वस्तुस्थितीमुळे या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या राजकीय पालटामागे काँग्रेसची दुर्लक्ष नीती हे मुख्य कारण आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने धानोरकर यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते नाराज होते. भाजपने या संधीचा फायदा घेऊन त्यांना आपल्या पक्षात ओढले.
धानोरकर गेल्या अनेक वर्षांभर भद्रावतीमध्ये सक्रिय राजकारण करत आहेत आणि शिवसेनेतून नगराध्यक्षपद भूषवलेले आहेत. .
ही राजकीय उलथापालथ झाल्यामुळे वरोरा-भद्रावती विधानसभेचे समीकरण पूर्णतः बदलले आहे. याचा सर्वात जास्त परिणाम येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर होणार आहे. भद्रावतीसह संपूर्ण विधानसभा क्षेत्रात आता भाजपची पक्की जमीन निर्माण झाल्याचे जाणकारांचे मत आहे. काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांसमोर आता मोठे आव्हान उभे आहे.
**********************
Comments
Post a Comment