*ग्रामीण पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे: खवसे**चंद्रपूर गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात केले प्रतिपादन**श्याम ठेंगडी व मंगल जीवने कर्मवीर पुरस्काराने सन्मानित*
*चंद्रपूर गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात केले प्रतिपादन*
*श्याम ठेंगडी व मंगल जीवने कर्मवीर पुरस्काराने सन्मानित*
वरोडा : प्रतिनिधी
कोणत्याही वर्तमानपत्रांमध्ये कार्य करणाऱ्या पत्रकारात जवळपास 70 टक्के ग्रामीण पत्रकार आहेत. वर्तमानपत्राचा कणा समजल्या जाणाऱ्या या ग्रामीण पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत. परंतु या समस्यांबाबत वर्तमानपत्राचे प्रशासन फारसे गंभीर दिसत नाही.ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी श्रमिक पत्रकार संघटनांनी ग्रामीण भागातील पत्रकारांच्या संघटनांसोबत लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत दैनिक नवराष्ट्रचे वृत्त संपादक डॉक्टर गणेश खवसे यांनी चंद्रपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
चंद्रपूर गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने १ ऑगस्ट रोज शुक्रवारला झालेल्या कर्मवीर पुरस्कार वितरण समारंभाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर गणेश खवसे हे बोलत होते.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
चंद्रपूर गडचिरोली पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देणारे व सामाजिक कार्यासोबत ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वरोडा येथील जेष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी व बल्लारपूरचे जेष्ठ पत्रकार मंगल जीवने यांना कर्मवीर पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सत्कारमूर्ती यांचा पुलकित सिंह व गणेश खवसे यांच्या हस्ते सपत्नीक शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मान राशी देऊन सत्कार करण्यात आला.
पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या घटनेचे योग्य विश्लेषण करूनच आपले सकारात्मक लिखाण करावे असे मत याप्रसंगी रवींद्र शिंदे यांनी व्यक्त केले.
पत्रकार हा समाजाचा घटक असल्याने समाजातील चांगल्या व वाईट बाबींचे प्रतिबिंब त्याच्यातही उमटते. परंतु पत्रकार म्हणून कार्य करताना सकारात्मक भूमिकेतून पत्रकारांनी वस्तुनिष्ठ लिखाण करावे असे मत व्यक्त करत चंद्रपूर गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाने आपला सत्कार केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी यांनी संघाचे कौतुक करत आपल्या परिवाराने केलेला हा सत्कार आपल्या स्मरणात नेहमीसाठी राहील असे उद्गार त्यांनी सत्काराला सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना काढले.यावेळी मंगल जीवने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी वर्तमानपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस मालार्पण व दीप प्रज्वलनाने झाली.
यानंतर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापक शाम हेडाऊ यांनी कार्यक्रमाचे संचलन तर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव प्रवीण पालखी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पत्रकार मंडळी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
पत्रकार हा समाजाचा घटक असल्याने समाजातील चांगल्या वाईट यांचे प्रतिबिंब त्याच्यातही उमटते परंतु पत्रकार म्हणून कार्य करताना सकारात्मक भूमिका घेऊन पत्रकारांनी वस्तूनिष्ठ लिखाण करावे असे मत व्यक्त करत चंद्रपूर गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाने आपला सत्कार केल्याबद्दल सत्कारमूर्ती वरोऱ्याचे ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी यांनी कौतुक केले. आपल्या परिवाराने केलेला हा सत्कार आपल्या नेहमीसाठी स्मरणात राहील असे उद्गार यावेळी व्यक्त केले.
Comments
Post a Comment