फक्त बातमी
प्रवीण मुधोळकर
पडोली- श्री साई मतिमंद शिक्षण संस्था ,चंद्रपूर द्वारा संचालित स्वीकार दुर्बल मनस्क ( मतिमंद) निवासी शाळा ,पडोली (मोरवा) येथे स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजीव देवईकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. मृदुला देवईकर तसेच संस्थेच्या सचिव रेखा पिंपळशेंडे उपस्थित होत्या. सचिव रेखा पिंपळशेंडे यांनी शाळेच्या कार्याची माहिती दिली. डॉ. देवईकर यांनी आपल्या मनोगतात संस्थेद्वारे मतिमंद यांच्या विकासाकरिता करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची प्रशंसा केली. याप्रसंगी लायन्स क्लब, चंद्रपूर चे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचा सहभाग होता. लायन्स क्लब द्वारे यावेळी संस्थेला संगणक संच भेट देण्यात आला आणि संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी क्लबच्या अध्यक्षा कांचन ढोरे, सचिव सरिता घाटे आणि कोषाध्यक्षा वर्षा कोठेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीते आणि नृत्य प्रस्तुत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता लोढे शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रकाश राजूरकर यांनी केले.
Comments
Post a Comment