**अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची वरोरा नगर कार्यकारिणी जाहीर**

**अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची वरोरा नगर कार्यकारिणी जाहीर**  

फक्त बातमी 
चेतन लूतडे वरोरा 

**वरोरा, १७ ऑगस्ट २०२५:** अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) या संघटनेने वरोरा नगर शाखेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या टीममध्ये विविध पदांसाठी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.  

नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये **आदित्य वरखडे** यांना नगर मंत्री, **फकीरा निखाडे** आणि **रिया बालवंच** यांना नगर सहमंत्री, **खुशी सालेकर** यांना नगर कार्यालय मंत्री, **प्रतीक्षा ढवस** यांना नगर कोष प्रमुख तर **गौरी कैकाडे** यांना नगर सोशल मिडिया प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  

याशिवाय, **तनु शिडाम** (सह सोशल मिडिया प्रमुख), **स्नेहा अक्कल** (विकासार्थ विद्यार्थी), **वैष्णवी बालवावं** (सह विकासार्थ विद्यार्थी संयोजक), **सावरी हांडे** (राष्ट्रीय कला मंच संयोजक), **माहीम शेख** (सह राष्ट्रीय कला मंच संयोजक), **नीरज आत्राम** (खेलो भारत खेलो संयोजक), **अंकिता शेडमाके** (वसतिगृह प्रमुख), **रेणू आखरे** (ॲग्रीव्हिजन संयोजक), **कोमल सरोदे** (ॲग्रीव्हिजन सहसंयोजक), **प्रणाली निखाडे** (छात्र विद्यार्थी प्रमुख) यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.  

सदस्य म्हणून **नंदिनी धवस, प्रेम कुलसंगे, हर्ष धोंगडे, ओम ठेंगडे, सुजान चौधरी, अतीक्षा भांडेकर** यांना समाविष्ट करण्यात आले आहे. संघटनेतर्फे सर्व नवनियुक्त कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.  

नवीन टीमने विद्यार्थ्यांच्या हितासाठी ऊर्जस्वित कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

Comments