**वरोरा** : वरोरा तालुक्यातील चिनोरा गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश उर्फ चिरकुटा ढेंगळे यांनी गावातील युवक सौरभ झाडे याला फोनवर अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असून, या घटनेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ताज्या घटनेत अविनाश ढेंगळे यांनी गावातील दुसऱ्या एका व्यक्तीवर हल्ला केल्याने त्यांना स्वतःच मारहान सहन करावी लागली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर वरोरा पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूंनी तक्रारी नोंदवल्या आहेत. याआधी, सौरभ झाडे याने गावातील मोबाईल टॉवरला NOC (No Objection Certificate) मंजुरीबाबत प्रश्न विचारल्यावर ढेंगळे यांनी त्याला फोनवर धमकावल्याचे सांगितले जाते. यामुळे सौरभ गावाबाहेर लपून राहिला होता. नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यास मदत केली.
याआधीही ढेंगळे यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी लबाडीने विकत घेण्याबाबत अनेक खटले न्यायालयात चालू आहेत. गावातील अनेकांवर दहशत पसरवल्याचेही आरोप आहेत. या घटनेमुळे तालुक्यात राजकीय तणाव निर्माण झाला असून, प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment