शिवसेनेच्या वतीने भद्रावती मध्ये भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजशिवसेना नेते मुकेश जीवतोडे यांचे भव्य आयोजन.
शिवसेना नेते मुकेश जीवतोडे यांचे भव्य आयोजन.
भद्रावती, १५ ऑगस्ट २०२५
चेतन लूतडे
– श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १६ ऑगस्ट (शनिवार) रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, बंगाली कॅम्प, भद्रावती येथे पार पडणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोविंदा पथक येणार असून यासाठी आयोजकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्यवस्था केली आहे.
सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत
रांगोळी स्पर्धा,
दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत
महिला भजन मंडळ सत्कार,
सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत
*वेशभूषा स्पर्धा** तर ७ ते १० वाजेपर्यंत **दहीहंडी स्पर्धा** भरविण्यात येणार आहे.
प्रख्यात नृत्य कलावंत उज्वला पुणेकर यांचा संच व अँकर म्हणून परेश जी या कार्यक्रमासाठी येणार आहे.
33 फुटवर भव्य रोषणाईत सजलेली दहीहंडी फोडण्यासाठी पुरुषांसाठी 51000 रुपये रोख पारितोषिक तर 25 फूटावरती महिलांसाठी 25000रू. रोख पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. याबरोबर अनेक पारतोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणारा आहे.
या कार्यक्रमात शिवसेना पक्षाचे राज्यमंत्री **अॅड. आशिष जयस्वाल** (वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय खाते) तसेच **गडचिरोली जिल्हा सहपालकमंत्री** आणि **रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार** यांची उपस्थिती अपेक्षित आहे. शिवसेना पक्षाचे **लोकसभा संघटक मुकेश मनोज जिवतोडे** (चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत.
नागरिकांना या उत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment