वरोरा पोलिसांनी एम.डी. ड्रग्स विक्रेत्यास धरले, ८० हजारांचा माल जप्त

वरोरा पोलिसांनी एम.डी. ड्रग्स विक्रेत्यास धरले, ८० हजारांचा माल जप्त
  
वरोरा, १४ ऑगस्ट २०२५

— पोलिस ठाणे वरोराने गेल्या दिवशी (१३ ऑगस्ट) एम.डी. ड्रग्सच्या अवैध विक्री करणाऱ्या आरोपी महेश नारायण खामनकर (वय २५) याला धरून अटक केली आहे. देशपांडे ले-आउटमधील स्वामी समर्थ मंदिराजवळील त्याच्या निवासस्थानावर पोलिसांनी केलेल्या पंचसाक्षी झडतीत २.९२० ग्रॅम एम.डी. ड्रग्स (बाजार किंमत ₹१०,०००) आणि एक मोटारसायकल (किंमत ₹७०,०००) जप्त केले. एकूण ₹८०,००० मूल्याचा हा मुद्देमाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.  
  
ठाणेदार अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात पोलिस टीमने गोपनीय माहितीवरून ही कारवाई केली. या टीममध्ये सपोनी शरद एस. भस्मे, पोहवा संदिप (क्र. २५७१), दिलीप सुर (क्र. २२४४), संदिप वैदय (क्र. ९१०), दिपक मोडक, पो.अं. मनोज ठाकरे (बी.नं. १३९९), पो.का. महेश गावतुरे, विशाल राजुरकर (बी.नं. ०१), जाधव आणि म.पो.अं. तेजस्वीनी गारघाटे (बी.नं. ८८४) यांचा समावेश होता. कारवाई पोलिस अधीक्षक (सा.) चंद्रपूर, अप्पर पोलिस अधिक्षक (सा.) चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
  
आरोपीविरुद्ध अमली पदार्थ अधिनियम (NDPS Act, 1985) च्या कलम ८(क) आणि २१(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला ड्रग्स रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.  
  
वरोरा पोलिसांनी ड्रग्स विक्रेत्यांविरुद्ध "धडक कारवाई मोहीम" सुरू केली असून, सामान्य नागरिकांना अशा गुन्हेगारांची माहिती मिळाल्यास **फोन क्र. ०७७६-२८२०९३** वर त्वरित कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस स्टेशन हद्दीत ड्रग्स विक्रीच्या कोणत्याही संशयास्पद  माहित असल्यास  पोलिसांना द्यावी त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आव्हान वरोरा ठाणेदारांनी केले आहे.
******************

Comments